पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांचा काळ्या फिती लावून निषेध
शवविच्छेदन करण्यास नकार
डोंबिवली :- ( शंकर जाधव )
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयाची अवस्था दयनीय होत असताना वाढीव कामाचा बोझा येत असल्याने येथील डॉक्टर्स पुरते वैतागले आहेत. त्यात या रुग्णालयातील डॉक्टर्सना कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात शवविच्छेदनास जावे लागणार असल्याचे आदेश पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दिले. याला कडाडून विरोध करत येथील डॉक्टर्सने काही वेळ काम बंद केले होते. याची माहिती मिळताच प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू लवंंगरे यांनी डॉक्टरांनी समजूत काढली. काही वेळ चर्चा झाल्यावर डॉक्टरांनी काळ्या फिती लावून दिवसभर काम केले मात्र डॉक्टरांनी दिवसभर काळ्या फिती लावून काम केले.
डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यास नकार असल्याचे प्रशासनला कळावे म्हणून गुरुवारी येथील डॉक्टरांनी काही वेळ काम बंद आंदोलन पुकारले होते. मात्र रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी खूप वेळ वाट पाहावी लागली.याची माहिती प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. लवंंगरे यांना समजताच त्यांनी डॉक्टरांची भेट घेऊन समजूत काढली. शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असताना रुक्मिणीबाई रुग्णालयात जाणे योग्य नाही. याबाबत डॉ. लवंंगरे यांना विचारले असता ते म्हणाले, पालिका प्रशासनाचे आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष होत आहे. डॉक्टरांची भरती झाली पाहिजे हे खरे आहे. जे शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर्स रुक्मिणीबाई रुग्णालयात गेले तर येथील रुग्णांवर वेळेवर उपचार मिळणार नाहीत. म्हणून याचा पालिका प्रशासनाने विचार केला पाहिजे.
--
Post a Comment