पहिली पेट्रोल विरहीत-बॅटरीवर चालणारी इको फ्रेंडली स्कुटर डोंबिवलीत दाखल 

(डोंबीवली प्रतिनिधी - शंकर जाधव) 



डोंबिवली शहर हे प्रदूषणबाबत राज्यात गाजत असताना आता मात्र यावर मात करण्यासाठी पहिली पेट्रोल विरहीत-बॅटरीवर चालणारी इको फ्रेंडली स्कुटर डोंबिवलीत दाखल झाली आहे. या दुचाकीबाबत शहरातील तरुणवर्गात खूपच कुतूहल असून याचा दुचाकीचा वापर केल्यास प्रदूषण नियंत्रण होईल असा विश्वास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. डोंबीवली जवळील दावडी नाका येथे  पहिल्या इको फ्रेंडली इलेक्ट्रॉनिक दुचाकीचे शोरुमचे उदघाटन राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.                 

     याप्रसंगी कल्याण डोंबीवली महापालिकेचे माजीउपमहापौर मोरेश्वर भोईरनगरसेवक जालिंदर पाटीलनगरसेविका ज्योती मराठेमाजी नगरसेवक राजन मराठेभाजप उपाध्यक्ष पंढरीनाथ म्हात्रे भाजप सरचिटणीस लक्ष्मण पाटील भाजप युवा ग्रामीण मंडल अध्यक्ष हनुमान ठोंबरेअॅॅटो झेडचे कृष्णमूर्ति नायडू व अविनाश सातपुते यावेळीउपस्थित होते. पर्यावरण पूरक वैशिष्ट्यामुळे ही स्कूटर अल्पावधीत लोकप्रिय होईल. अविनाश सातपुते माहिती देताना म्हणाले , ध्वनि प्रदूषण व वायुप्रदुषण व पेट्रोल पर्याय असणा-या या स्कुटरची ४० हजार व ७५ हजार अशी  किमंत आहे.पुर्णपणे बटरीवर चालणारी ही स्कुटर आहे. ३५ चा वेग ५५ चा वेग७५ चा वेग अश्या तीन प्रकारच्या स्कुटरची निर्मिती कंपनीच्या वतीने करण्यात आली आहे.अवघ्या वीस पैशात  एक किलोमीटर एवढे अंतर स्कुटर पार करु शकते. कल्याण डोंबीवली व अंबरनाथ येथे पहिल्यांदा या स्कुटरचे आगमन होत आहे. अॅॅटो झेड हे या पेट्रोल विरहीत-बॅटरीवर चालणारी इको फ्रेंडली स्कुटर वितरक आहेत. भारतातील सगळ्या  ई बाईकच्या तुलनेत ओकिनावा ग्रीन ही स्वस्त स्कुटर बाईक आहे.  लिथियम बँटरी असलेली स्कुटरची किमंत  ९६ हजार असून या स्कुटरसाठी  २२ हजाराची सबसिडी त्वरीत  प्राप्त होउ शकते.एचडीएफसी  बँकेकडून सबसिडी मिळू शकते. डोंबिवली नागरी बक व  आयसिआयसीआयकडे सबसिडीसाठी प्रस्ताव देण्यात आला असून यावर लोनची सुविधा आहे.यासाठी सुमारे सहा तास बॅॅटरी चार्ज करावी लागते.एकदा चार्ज केली की ही स्कुटर १६० किमी पर्यत प्रवास करु शकते. यातील नाॅॅर्मल बॅॅटरी धारण केलेल्या स्कुटरसाठी दोनवर्ष वाँरंटी व लिथियम बँटरी असलेल्या स्कुटर करिता चार वर्ष  वाँरंटी कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. तरुण पिढीसाठी विविध रंगातील आकर्षक माॅॅडेलची निर्मिती कंपनीच्या वतीने करण्यात आली आहे.थोड्याच अवधीत रस्त्यावर या इको फ्रेंडली दिसून येतील असा वितरकांचा दावा आहे.

      डोंबिवलीजवळील देसलेपाडा तेथे राहणारी महाविद्यालीन विद्यार्थ्यांनी जानव्ही पाटील हिने उद्घाटनानंतर पहिली पेट्रोल विरहीत-बॅटरीवर चालणारी इको फ्रेंडली स्कुटर खरेदी केली.हीच दुचाकी खरेदी करण्याबाबत विचारले असता ते म्हणाले, भविष्यात प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनणार आहे. त्यासाठी अश्या प्रकारच्या स्कुटर वापरल्यास शहरातील प्रदूषण नक्कीच कमी होईल. म्हणून जास्तीत जास्त तरुण वर्गाने अश्या  स्कुटरचा वापर केला पाहिजे.

Post a Comment

Previous Post Next Post