गण गर्जना ढोल ताशा पथक श्री क्षेत्र टिटवाळा आयोजित दिवाळी पहाट उत्सव २०१८ उत्साहात संपन्न

टिटवाळा : गण गर्जना ढोल ताशा पथक श्री क्षेत्र टिटवाळा आयोजित दिवाळी पहाट उत्सव २०१८ कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात गण गर्जना ढोल ताशा पथकाच्या जबरदस्त सलामीने झाली. त्यानंतर दिवाळी पहाट उत्सव २०१८  कार्यक्रमा अंतर्गत अनेक  सांस्कृतिक  कार्यक्रमाचे आयोजन टिटवाळा पूर्वेकडील प्रथमेश मंगल कार्यालयाच्या साईबाबा मंदिर प्रांगणात करण्यात आले होते. गंधर्व कलाधाराची सुगम सुरेल संगीत मैफिलीने  तसेच स्वराज ढोल ताशा पथक मोहने ह्या ढोल पथकाची वाद्याने या कार्यक्रमात रंगत आणली. K V DANCE ACEDAMY आणि  RISING STAR DANCE ACEDAMY ह्यांच्या कलाकारांनी सुंदर असे नृत्य अविष्कार सादर केले.

या कार्यक्रमात जय पिंपलेश्वर म्युझीकल ग्रुपटिटवाळा बिट्स म्युझीकल ग्रुपसाईनी बिट्स सुधान्शु म्युझीकल ग्रुप ह्यांनी सुद्धा आपल्या वादनातून लोकांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजेच टिटवाळयामधील बाल कलाकार आणि तरुण कलाकार यांना आपली कला सादर करण्यासाठी खुला रंगमंच उपलब्ध करून देण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने आपली कला सादर करण्यासाठी स्थानिक कलाकार उपस्थित होते.
जीवन संवर्धन फाउंडेशन म्हसकळ येथील अनाथ आश्रमातील मुलांनी सुद्धा संधीच सोन करत आपल्यातील कला लोकांसमोर सादर करून कौतुकाची थाप मिळवली.या दिवाळी पहाट उत्सव २०१८ या  कार्यक्रमातून टिटवाळा मधील कलाकारतरुण वर्ग तसेच वरिष्ठां  मधील कलागुणांना प्रोत्साहन देण्याची गण गर्जना ढोल ताशा पथकाची संकल्पना यशस्वी ठरली.

या  कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन आणि नियोजन गण गर्जना ढोल ताशा पथकाचे संस्थापक संजित चव्हाण आणि योगेश पाटील ह्यांनी उत्तम रित्या केले आणि त्याना ह्यात पथकातील सर्व वादकांनी मोलाची साथ देऊन कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.

Post a Comment

Previous Post Next Post