मुख्यमंत्र्यांच्या   २७ गावांसाठी दिलेले ६५०० कोटी पॅकेजच्या  आश्वासनबाबत  मनसेचा 
उपहासात्मक वाढदिवस ...


डोंबिवली :-   ( शंकर जाधव  )
    २०१५  साली कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या ५ व्या सार्वत्रिक निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 यांनी डोंबिवलीत प्रचाराचा नारळ फोडला होता. डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुल येथेही प्रचार सभेत २७
 गावांना आकर्षित करणारे ६५०० कोटी रुपयांचे आश्वासन दिले होते.त्यामुळे २७ गावातून भाजपच्या पारड्यात
 ९  भाजप पुरस्कृत नगरसेवक मिळाले.मात्र त्यानंतर २७ गावातील नागरिक या पॅकेजची वाट पाहत आहेत.तर
 दुसरीकडे २७ गाव हे पालिकेवर बोजा असल्याचे मत मनसेच्या  नगरसेवकांनी व्यक्त केले आहे.  या 
आश्वासना तिब वर्ष पूर्ण झाल्याने  मनसे डोंबिवलीत उद्या रविवारी सकाळी ११ वाजता मनसे मध्यवर्ती
 शाखेत उपहासात्मक वाढदिवस साजरा करणार आहे.या गावांचा विकास पालिकेतच आहे असे शिवसेनेचे
 नगरसेवकांचे म्हणणे असले तरी दुसरीकडे मनसे आणि संघर्ष समितीने मुख्यमंत्री खोटारडे अशी टीका केली 
आहे. २७ गावाची स्वतंत्र नगरपालिका व्हावी म्हणून संघर्ष समिती लढा देत आहेत.समितीच्या पदाधिकाऱ्यांनाही
  मुख्यमंत्री फडणवीस यांनी २७ गावांची वेगळी नगरपालिका करू असे आश्वासन दिले होते.मात्र मुख्यमंत्री 
दिलेला शब्द पळत नाही असे जाहीर सभेत समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार यांनी संगीतले होते.२८ ऑकटोबर
 २०१८ ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी २७ गावासाठी जाहीर केलेल्या ६५०० कोटी रुपयांच्या पॅकेज आश्वासनाला 
तीन वर्ष पूर्ण होत आहे.भाजप सरकार थापा देणारे सरकार असून यावर विश्वास ठेवू नका असे सांगत मनसे 
डोंबिवली मध्यवर्ती शाखेत रविवार २८ अॉक्टोंबर रोजी सकाळी ११वाजता  उपहासात्मक वाढदिवस साजरा
 करणार आहेत.यावेळी नागरिकांनी उपस्थित रहावे अशी विनंती मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत 
आणि विरोधी पक्ष नेते मंदार हळबे यांनी   केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post