डोंबिवलीत मनसेने गाजराचा केक कापून केला उपहासात्मक वाढदिवस साजरा....
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला तीन वर्षे पूर्ण झाल्याची करून दिली आठवण...
( डोंबिवली प्रतिनिधी : शंकर जाधव ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण- डोंबिवलीला स्मार्ट सिटीसाठी ६५०० कोटी रुपयांच गाजर देऊन तीन वर्षे उलटली.मुख्यमंत्र्यानी जनतेला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने डोंबिवलीत मध्यवर्ती शाखेने रविवारी उपहात्मक वाढदिवस साजरा केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी कल्याण डोंबिवलीकरांना सत्तेत आल्या पासुन व सत्तेत येण्यासाठी अनेक आश्वासनांची गाजरे दिली.मग ती 27 गावांचा प्रश्न असो, प्रोबेस कंपनी स्फोटातील नुकसान भरपाइचे आश्वासन असो,स्मार्ट सिटी, ग्रोॆथ सेंटर, अशी अनेक गाजरे दिली गेली.पण सर्वात मोठे गाजर म्हणजे ६५०० कोटींच्या पँकेजचे गाजर असो. ६५०० कोटी रुपायांच्या आश्वासनाला तीन वर्षे पूर्ण झाले.मनसेने उपहासात्मक वाढदिवस करत मनसेने मुख्यमंत्र्यांना जोकरची उपमा दिली.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत,डोंबिवली महिला अध्यक्षा मंदा पाटील, माजी नगरसेविका कोमल पाटील,जिल्हा संघटक राहुल कामत, जिल्हा सचिव प्रकाश माने,शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे, मनवीसे डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे,संघटक सचिन कस्तुर, सचिव कौतुभ फडके, प्रितेश पाटील, दिपतेश नाईक , मिहीर दवते, दीपक शिंदे, प्रथमेश खरात यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
व्हिडीओ बातमी YOUTUBE वर पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा > : डोंबिवलीत मनसेने गाजराचा केक कापून केला उपहासात्मक वाढदिवस साजरा
Post a Comment