“उत्सव जगातील
सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था सदृढ करण्याचा” या संकल्पनेखाली मतदार नोंदणी
व दुरुस्ती शिबिर संपन्न


टिटवाळा : भारतीय
जनता पक्ष आणि राज्य निवडणुक आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने १३८,कल्याण पश्चिम
विधानसभा क्षेत्रामधील मांडा-टिटवाळा परिसरातील नागरिकांसाठी “ उत्सव जगातील
सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था सदृढ करण्याचा ” या संकल्पनेखाली एकदिवसीय मतदान
नोंदणी शिबिराचे आयोजन रविवार दि.२८ /१०/
२०१८ रोजी येथील विद्यामंदिर शाळेच्या
परिसरात करण्यात आले होते. भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते केणे सर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.या शिबिरात यावेळी नविन मतदार नोंदनी,दुरुस्ती तथा नावे
जर इतर ठिकाणाची नावे सध्या राहत असलेल्या ठिकाणी करून घेणे अशी नोंदणी देखील या शिबिरात करण्यात आली.
यावेळी परिसरातील अनेक नागरिकांनी या
शिबिराचा लाभ घेतला, यावेळी नविन मतदार नोंदणी तसेच नोंदणी असलेल्या मतदारच्या
दुरुस्तीबाबतचे अर्ज भरण्यात आले. सुमारे २६५६ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत
आपली नोंदणी केली. या शिबिरात शासनाच्या विविध योजना ,सेवा ई-गव्हर्नन्स
प्रणाली माध्यमातून पोहचवणाऱ्या ‘डिजिटल सेवा फौंडेशन’चे अध्यक्ष विजय रूपचंदानी
आणि सेक्रेटरी योगेश जोशी यांचे या शिबिरात मोलाचे सहकार्य लाभले.
आपल्या
परिसराच्या जवळच नोंदणीची सोय उपलब्ध करून दिल्याने नागरिकांनी भारतीय जनता पार्टी
आणि या शिबिराच्या आयोजिका उपमहापौर,क.डों.म.पा. उपेक्षा भोईर यांचे आभार मानले. यावेळी "मतदानाचा हक्क हा प्रत्येक नागरिकांनी
बजावला पाहिजे. आपल्या मतदानाच्या हक्काविषयी सर्व नागरिकांनी जागरुक असायला हवे, यामुळे जगातील सर्वात मोठी
लोकशाही व्यवस्था सदृढ होण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा हातभार लागेल. मतदान
हे आपले प्रत्येकाचे नैतिक कर्तव्यच आहे." असे मत यावेळी उपमहापौर भोईर यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी आमदार नरेंद्र पवार यांसह अनेक
प्रशासकीय अधिकारी यांनी उपस्थिती लावली होती. सदर कार्यक्रमासाठी भाजपचे
मोहने-टिटवाळा मंडळाचे सरचिटणीस शक्तीवान भोईर, भाजपाचे अनिल फड,अमोल केदारे यांसह अन्य भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या यांनी
परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वीपणे पार
पाडला.
Post a Comment