डोंबिवलीतील प्रदूषण कमी  होणार ....

सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे  नूतनीकरण

डोंबिवली :-  ( शंकर जाधव  )


 डोंबिवलीतील प्रदुषणाची गंभीर दखल घेऊन हरित लवादाने औद्योगिक विभागातील ८६ उद्योग बंद ठेवण्याचे आदेश दिले होते त्याचा परिणाम म्हणून गेल्या दिड वर्षात औद्योगिक विभागातील सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या   नूतनीकरणाचे काम करण्यात येत होते ते आता पूर्ण झाले असून आज त्या नूतनीकरण केलेल्या प्रक्रिया केंद्राचे  उदघाटन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रदेशिक अधिकारी धनंजय पाटील यांचे हस्ते करण्यात आले त्यामुळे रासायनीक कारखान्याचे प्रदूषित पाणी बंद पाईपमार्फत खाडीत सोडण्यात येत असल्याने डोंबिवलीचे प्रदूषण कमी होणार आहे.

    डोंबिवली आद्योगिक विभाग २ मधील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या  कार्यालयाचे व तांत्रिक प्रक्रिया यामध्ये केलेल्या नूतनीकरणाचे उदघाटन आज करण्यात आले सुमारे २ कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात आले असून सध्या उद्योगांना २५ टक्के प्रदुषीत सांडपाणी प्रक्रिया केंद्रात सोडण्याची परवानगी असून उद्योजकांनी आता १०० टक्के पाणी शुध्दीकरणासाठी सोडण्याची परवानगी मागावी असा सल्ला पाटील यांनी या प्रसंगी दिला. बंदिस्त पाईपमार्फत पाणी खाडीत सोडण्यात येत असल्याने डोंबिवलीतील नाल्यामध्ये आता प्रदुषित पाणी सोडले जाणार नाही यामुळे प्रदुषण कमी होईल. काहीवर्षापूर्वी हरित न्यायालयाने वादग्रस्त ठरलेला डोंबिवली सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आज वर्षभराच्या कालावधीतच अतिशय चांगल्या पद्धतीने सुधारणा करून चालू करण्यात आल आहे. या यशस्वी प्रक्रियेचे श्रेय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, कारखानदारांचे सदस्य, कारखानदारांमध्ये निर्माण पर्यावरणविषयक जागृतीला तसेच प्रक्रिया संयंत्रणाना चालवण्यासाठी दिवस रात्र काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाला द्यावे लागेल. सामुहिक सांडपाणी प्रक्रिया संयंत्र हे एक आदर्श केंद्र बनण्यासाठी  डोंबिवली सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे संचालक मंडळ उत्सुक आहे, असा विश्वास कामा संघटना सेक्रेटरी देवेन सोनी यांनी या प्रसंगी व्यक्त केला. सर्व उद्योजकांनी यासाठी निधी दिला असून डोंबिवली औद्योगिक विकास मंडळाने पाईपलाईन टाकली आहे यामुळे सर्वाच्या सहकार्याने हे काम झाल्याचे सोनी यानी सांगीतले. या सर्व कामावर नियंत्रण ठेवण्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळ ठेवणार असून आन लाईन मार्फतही देखरेख ठेवता येणार आहे. बंद पाईपलाईनमार्फत प्रदुषित पाणी सोडण्यात येत असल्याने नाल्यामध्ये दुसरे कोणी पाणी सेाडत असेल तर त्यावर भरारी पथकामार्फत लक्ष ठेवा अशी सूचना पाटील यांनी केली. पल्लवी फौजदार,यानी प्रस्तावना केली तर कमल कपूर यांनी सूत्रसंचलन केले कामा या संघटनेचे अध्यक्ष मुरली अय्यर डोंबिवली सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे संचालक मंडळ सदस्य, त्यांचे तांत्रिक सल्लागार , डोंबिवली सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची प्रक्रिया वापरणाऱ्या कारखान्यांचे सदस्य, डोंबिवली सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालवणारे कंत्राटदार, पलाश टेक्नोलॉजी अॅड सर्विसचे पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post