माजी खासदार सुरेश टावरे मुरबाडच्या दौऱ्यावर
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीसह आघाडी भक्कम माजी खासदार सुरेश टावरे यांचे प्रतिपादन
मुरबाड दि. (प्रतिनिधी-लक्ष्मण पवार). नव दुर्गा मातेच्या उत्सवाचे व राज्यांमध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असता. मुरबाडमध्ये इंदिरा काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात माजी खासदार तथा ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सुरेश टावरे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी पत्रकारांशी बोलताना टावरे म्हणाले की "भाजपच्या कालावधीमध्ये योजनांचा फुसका बार निघाला आहे त्यामुळे संतप्त मतदार राजा काँग्रेस आघाडी करू लागला आहे त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस राष्ट्रवादीसह सेक्युलर पक्ष यांची भक्कम आघाडी होऊन सर्व जागा आघाडी जिंकेल" . या दरम्यान तालुक्यातील कोरावळे माजगाव आंबळे सोनगाव शिरवली गणेश नगर मुरबाड येथील दुर्गा मातेचे दर्शन घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी इंद्रा काँग्रेस मुरबाड तालुका अध्यक्ष कृष्णकांत तुपे शहापूर तालुका अध्यक्ष महेश धनके काँग्रेस पर्यावरण अध्यक्ष नरेश मोरे ओबीसी जिल्हाध्यक्ष रवींद्र परटोले सेवादल शहापूर तालुका अध्यक्ष रामचंद्र जोशी मुरबाड पर्यावरण अध्यक्ष पर्यावरण शहराध्यक्ष एडवोकेट किरण थोरात तानाजी घागस अरुण ठाकरे शहापूर अध्यक्ष व अंकुश भोईर हे उपस्थित होते.
Post a Comment