पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात गरोदर महिलांची डिलिव्हरी करण्यास नकार.....

रविवारी रुग्णालयात डॉक्टर  नसल्याने रुग्णाचे नातेवाईक नाराज...

मनसे विचारणार आयुक्तांना जाब 

डोंबिवली( शंकर जाधव)  


  कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेचे सुतिकागृह बंद असताना दुसरीकडे डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर नसल्याने चक्क एका महिलेला डिलिव्हरीसाठी येथील परीचारिकेने  डॉक्टर नसल्याचे सांगत  खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.त्यामुळे सदर महिलेच्या नातेवाईकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावर पालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेऊन जाब विचारणा आहेत.

पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात सकाळ ते दुपार रुग्णांची गर्दी असल्याने डॉक्टरांना यावे लागते.मात्र दुपारनंतर काही डॉक्टर रुग्णालयात नसल्याचे दिसून आले.या रुग्णालयात गरोदर महिला नाव नोंद करत असूनही डिलिव्हरीच्या वेळी काही महिलांना रुग्णालयात डॉक्टर नसल्याचे कारण सांगत खाजगी रुग्णालयात जाण्यास सांगितले जाते. डोंबिवलीत राहणाऱ्या एका गरोदर महिलेला तिचे नातेवाईक शास्त्रीनगर रुग्णालयात घेऊन गेले.मात्र रुग्णालयात डॉक्टर नसल्याने येथील परीचारिकेने येथे डिलिव्हरी होणार नसल्याचे नातेवाईकांना  सांगितले.यावर वैतागलेल्या नातेवाईकांनी याचा जाब विचारत पालिकेचे रुग्णालय गरीब रुग्णासाठी नसतील तर  रुग्णालय बंद करा असे सांगितले.त्यानंतर वेळ न दवडता महिलेच्या नातेवाईकांना ठाणे येथील रुग्णालयात जावे लागले.पालिकेच्या रुग्णवाहिकाही उपलब्ध झाली नसल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णवाहिकेतून महिलेला घेऊन जावे लागले.सदर घटनेची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांना समजल्यावर त्यांनी याबद्दल पालिका आयुक्तांना जाब विचारणा असल्याचे सांगितले.
 तर आरपीआय  युवक आघाडी पूर्व  अध्यक्ष  विठ्ठल खेडकर यांनी शास्त्रीनगर रुग्णालयात हा पहिला प्रकार नाही.यापूर्वी अनेक वेळेला असे प्रकार घडले आहे.पालिकेचे रुग्णालय हे गरीब रुग्णांसाठी असून त्यांना जर वेळेवर उपचार मिळत नसेल तर अश्या रुग्णालयाचा काय फायदा? येथील डॉक्टर रविवारी का दांडी मारतात याचे उत्तर पालिका आयुक्तांना द्यावे लागेल. 

शास्त्रीनगर रुग्णालयासमोरील मेडिकल दुकानातूंच औषधे घेण्याची  डॉक्टरांची ' आयडिया' 

शास्त्रीनगर रुग्णालयासमोरील दोन मेडिकल दुकानात औषधासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना पाठविले जाते.वास्तविक पालिका प्रशासन लाखो - करोडो रुपये खर्च करून रुग्णालयात औषधे उपलब्ध करून देत असताना या रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांना  औषधाची चिठ्ठी देऊन याच दोन मेडिकल दुकानात का पाठवतात असा प्रश्न रुग्ण विचारीत आहेत.त्यामुळे या  मेडिकल दुकानदारांची चांदी होत असली तरी गरीब रुग्ण कर्जबाजरी होतो.माजी नगरसेवक रणजित जोशी यांनी काही वर्षांपूर्वी या प्रकारचा जाब विचारला होता.मात्र अनेक वर्षांपासून हा प्रकार राजरोजपणे सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post