महिलांचे वैचारिक कविसंमेलन संपन्न
सातारा: कास पुष्प पठार सातारा येथे कवी नवनाथ रणखांबे यांच्या संकल्पनेतून पहिले महिलांचे कवी संमेलन जेष्ठ साहित्यिका संजीवनी राजगुरु यांच्या अध्यक्ष ते खाली नुकतेच संपन्न झाले. या कवि संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून विद्रोही कवी राजन गवळी , कवी नवनाथ रणखांबे, कवी सुनील पवार ,कवी अजित उमटकर प्रामुख्यानें उपस्थित होते.
जेष्ठ कवियत्री ज्योती गोळे, निर्मला पाटील, शुभांगी ऐलवे, शोभा साळवे, नीता चव्हाण,माधुरी सपकाळे, कल्पना म्हापुसकर,माधुरी फालक, कल्पना फालक, अशा रणखांबे,प्रज्ञा चव्हाण, मीरा साफकाळे, इ. व्यक्तिगत परिचय , आणि चारोळी,गाणी,कविता सादरीकरणाने कार्यक्रमास रंगत वाढली.राजन गवळी यांनी प्रेम कविता सादर केली आणि कार्यक्रमास बहार आणला. नवनाथ रणखांबे यांनी माजोऱ्या पाऊसा हि कविता सादर करून पाऊसला कविसंमेलनाच्या कोर्टात खेचले.असे महिलांचे वैचारिक कविसंमेलनाचे कार्यक्रम झाले पाहिजेत.प्रबोधन असणाऱ्या कवितांची सामाजिक बदलासाठी गरज असल्याचे आवर्जून बोलताना मत व्यक्त केले. जेष्ठ साहित्यीका संजीवनी राजगुरु यांनी सुंदर गाणे सादर केले आणि अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करून सर्वांनी महिलांच्या वैचारिक कविसंमेलनात सहभागी झाल्याबद्दल आभार व्यक्त केले.
Post a Comment