भा.ज.पा. कल्याण
ग्रामिण सरचिटणीस सुनिल शांताराम डवले आणि मोरया बॉईज सांगोडे यांनी केली आदिवासी पाड्यावर दिवाळी साजरी
टिटवाळा : आपण ही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून
सांगोडे गावातील समाजसेवक आणि भा.ज.पा.
कल्याण ग्रामिण सरचिटणीस सुनिल शांताराम डवले तसेच मोरया बॉईज सांगोडे यांनी
नवेगाव मुरबाड येथील आदीवासी पाड्यावर दिवाळी साजरी केली.
सांगोडे गावातील सर्व नवतरुण तसेच मनोज प्रा.
ट्युशनचे संचालक मनोज सर हे देखील कार्यक्रमासाठी आपला मदतीचा हात पुढे करतांना
उपस्थित होते. आदीवासी बांधवांना मिठाई, धान्य, साड्या, पणत्या, शैक्षणिक साहीत्याचे वाटप करण्यात आले, अशा प्रकारे ही दिवाळी साजरी करण्यात आली. आदीवासी बांधवांच्या सोबत ही साजरी केलेली दिवाळी स्मरणीय राहिल्याच्या भावना यावेळी भा.ज.पा. कल्याण ग्रामिण सरचिटणीस सुनिल शांताराम
डवले आणि मोरया बॉईज सांगोडे यांनी व्यक्त केल्या.
Post a Comment