"सांगड "या सामाजिक संस्थेकडून इंन्फटला दिवाळी निमित्त किराणा
-------------------------------------------------------------------
टिटवाळा : दिवाळीत अनेकजण आपल्या परिवारासह फटाक्यांची आतिषबाजी करत फराळ आणि मिठाईचा आस्वाद घेत आपल्या आप्तेष्टांना भेटवस्तु देउन सुट्टीचा आनंद घेत असतात मात्र याहीपलीकडे जाऊन समाजाप्रती संवेदशीलता असणारी अनेक मंडळी अनेक संस्था आदीवासी पाड्यावर ,आश्रमशाळेत जाऊन अथवा एखाद्या गरजु कुटुंबाना मदत देखिल करत असतात . अश्याच प्रकरे आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांतुन सतत सामजिक भान जपणाऱ्या टिटवाळा ठाणे,येथील सांगड ही सामाजिक संस्था देखिल या बाबत नेहमीच पुढाकार घेत असते यावर्षी देखील सांगड संस्थेच्यावतीने HIV. सह जगणाऱ्या इंन्फट इंडियाच्या 75 अनाथ व उपेक्षित बालकांच्या दिवाळीचा किराणा सामान भरून अनाथाची दिवाळी साजरी केली आहे.
सांगडच्या सर्व सहकारी मित्राच्या मदतीने २५७००/- रूपयांचे दिवाळीचे सामान या वेळी इंन्फट इंडिया संस्थेस देण्यात आले.
Post a Comment