डोंबिवलीतील आंतरराज्यीय बुध्दीबळ स्पर्धेला उत्फूर्त प्रतिसाद ..
डोंबिवली :- ( शंकर जाधव ) भारतीय जनता पार्टी व ठाणे प्ले चेस अॅॅकेडमीच्या वतीने प्रगती महाविद्यालयाच्या ठाणे जिल्हा आगरी समाज सभागृहात पार पडलेल्या बुध्दीबळ स्पर्धेला उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत केंद्र शासित प्रदेशातील सिल्ववासा, दादरा नगर हवेली,गुजरात, या राज्यातून राज्यपातळीवरील २६ बुध्दीबळ खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आले होते.१२ वर्षाखालील मुलाच्या गटात डोंबिवलीतील रोनित सावंत या विजेता ठरला. खुल्या गटातील विजेत्या व उपविजेते स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, चषक व पदक देउन सन्मानित करण्यात आले.
या टुर्नामेंटचे उदघाटन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले.यावेळी माजीमंत्री जगन्नाथ पाटील, वाँर्ड क्र ७७ चे भाजपचे अध्यक्ष मनोज पाटील, कल्याण जिल्हा चिटणीस नंदू परब, डोंबिवली शहर अध्यक्ष संजीव बिरवाडकर , रवीसिंग ठाकूर, नगरसेवक मुकुंद पेडणेकर , माजी नगरसेवक नितीन पाटील, पप्पू म्हात्रे, धैैर्य वाघेला,उमेश साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.स्पर्धेत सुमारे २५० स्पर्धक सहभागी झाले होते. मनोज पाटील यांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा आयोजित केली होती. ७ ते ४६ वयोगटातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. ७ ते ४६ वयोगटातील खेळाडू या स्पर्धेत होते.या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांनी जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर डोंबिवलीचे नाव उंचावतील अशी अशा बाळगतो. तर राज्यपातळीवरील सुवर्ण पदक विजेते खेळाडूंचा समावेश होता. राज्यपातळीवरील सर्वोत्तम गणले गेलेले प्रशिक्षक विक्रम मिश्रा या स्पर्धेत सहभागी झाले होते..गरिब व होतकरु विद्यार्थ्यांना बुध्दीबळ खेळाचे प्रशिक्षण मिश्रा देत असतात.प्रशिक्षण घेण्यासाठी ही मुले कष्ट घेत असून त्यांना आर्थिक सहाय्य करावे. प्रवास खर्च द्यावा, शालेय सुट्यांची सवलत मिळावी. इत्यादी सुविधा शासनाने द्याव्यात असे मिश्रा म्हणाले.खुल्या गटातील विजेत्या व उपविजेते स्पर्धकांना रोख पारितोषिक चषक व पदक देउन सन्मानित करण्यात येणार आहे.
खुली स्पर्धतील पारितोषिक विजेते आणि उपविजेते ( मुले )
१) संजीव नायर - चषक आणि रोख रक्कम ५ हजार रुपये
२) गजानन जेडे- चषक आणि रोख रक्कम साडे तीन हजार रुपये
३) ओम थरोला -चषक आणि रोख रक्कम अडीच तीन हजार रुपये
----------------------------------------------------------------------------------------------
खुली स्पर्धतील पारितोषिक विजेते आणि उपविजेते ( मुली )
१) सीना चोपरा - चषक
२) जेनिस बर्बोजा- चषक
३) नेहा डिसोजा - चषक
--------------------------------------------------------------------------------------------------
८ वर्षाखालील विजेते मुले
१) रिषभ सिंग - चषक
२) अभिनव मिश्रा - चषक
३) इशांत तेंडोलकर - - चषक
-------------------------------------------------------------------------------------------------
८ वर्षाखालील विजेत्या मुली
१) यशस्वी गायकवाड - चषक
२) प्रज्ञा दीक्षित - चषक
--------------------------------------------------------------------------------------------------
१० वर्षाखालील विजेते मुले
१) समर्थ पाटकर - - चषक
२) पारस भोईर - चषक
३) क्षितीज दत्ता - चषक
-----------------------------------------------------------------------------------------------------
१० वर्षाखालील विजेत्या मुली
१) सनवी सोमण - चषक
२) कार्तिकी गुळवे - चषक
-----------------------------------------------------------------------------------------------
१५ वर्षाखालील विजेते मुले
१) सोहम रघुवंशी - पदक
२) हंसराज भावे - पदक
३) अनुज मडके - पदक
----------------------------------------------------------------------------------------------
१५ वर्षाखालील विजेत्या मुली
१) अनायदा संतोष - चषक
२) संजना शर्मा - चषक
Post a Comment