भोपर गावात रोडरोमियोची दहशत...
भररस्त्यात तरुणीचा विनयभंग ....
डोंबिवली :- ( शंकर जाधव )
डोंबिवली पूर्वेकडील भोपर गावात रोडरोमियोचा जाच वाढला असून महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे .रिक्षाने प्रवास करणाऱ्या एका २२ वर्षीय महिलेची रिक्षा अडवून विनयभंग करत रिक्षा चालकाकडे या पीडित तरुणीचा मोबाईल नंबर मागितला. घाबरलेल्या तरुणीने घडलेल्या प्रकार पीडित तरुणीने घरी सांगितला. त्यामुळे पीडितेच्या वडिलांनी या रोडरोमियोचे घर गाठत त्यांच्या कुटुंबियाना घडला प्रकार सांगितल्याचा रागातून या रोड रोमियोनी या रिक्षा चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी घडली .या प्रकरणी पीडित तरुणीने मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून हा तक्रारी नुसार पोलिसांनी अमित पाटील,मनोज देसले, मुकेश पाटील,तात्या, विभीषण पाटीलविरोधात गुन्हा दखल केला आहे .
डोंबिवली पूर्वेकडील भोपर गावात राहणारी सदर पीडित महिला हॉटेलला भाकऱ्या विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात . गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सदर पीडित महिला रिक्षाने परतत असताना भोपर गावातील नाल्याजवळ अमित पाटील,मनोज देसले व विभीषण पाटील यांनी त्यांची रिक्षा अडवली .या तिघांनी रिक्षा चालक पंकज यादव यांच्याकडे पीडितेचा मोबाईल नंबर दे असे सांगत रिक्षात बसलेल्या सदर पीडित महिलेसोबत अश्लील वर्तन केले .घाबरलेल्या पीडितेने घडला प्रकार आपल्या आई - वडिलांना सांगितला.तिच्या वडिलांनी याबाबत मनोज देसले याचे गाठत त्याच्या कुटुंबियांना घडला प्रकार सांगितला . याच राग मनात धरून शुक्रवारी सायंकाळी पाबने दहा वाजण्याच्या सुमारास अमित पाटील,मनोज देसले ,तात्या ,विभीषण पाटील यांनी रिक्षा चालक पंकज याला गाठले व त्याला घडला प्रकार घरी का सांगितलं असे बोलत पाईपने बेदम मारहाण केली .या प्रकरणी पीडितेने मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असुन या तक्रारी नुसार पोलिसांनी अमित पाटील,मनोज देसले ,तात्या विभीषण पाटील विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .
Post a Comment