पालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना
गणवेशासाठी `आधार` ची सक्ती नाही .....
डोंबिवली :- दि. २४ ( शंकर जाधव )
पालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळेतील
अनेक विद्यार्थी गरीब आणि निराधार असल्याने त्यांना आधार कार्ड
काढण्यास पुरावा नसतो. त्यामुळे बँकेत खाती उघडता येत नसल्याने
विद्यार्थ्यांना गणवेशविना शाळेत जावे लागत होते. मात्र
आता शासनाच्या नवीन अध्यादेशानुसार पालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळेतील
विद्यार्थ्यांना गणवेशासाठी `आधार` ची
सक्ती केली जाणार नसून आता या विद्यार्थ्यांना शाळेतच गणवेश मिळणार आहेत.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळेत पुढील शैक्षणिक वर्षापासून
विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार असल्याची माहिती शिक्षण समितीचे सभापती विश्वदीप
पवार यांनी दिली.
राज्य शासनाने राज्यातील सर्व महानगरपालिका आणि जिल्हा परिषद
शाळेतील गरीब विध्यार्थ्यांना गणवेशाकरता आधार कार्ड सक्ती करण्याचे निर्देश दिले
होते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्याची बँक खाती असणे आवश्यक होते. पालकांना आधी
आपल्या खिशात हात घालून पाल्यासाठी गणवेश विकत घेणे शकत होत नव्हते. अनेक
विद्यार्थ्याचे पालक हे कामगार आणि मजूर म्हणून काम करतात. तर काही
विद्यार्थ्याच्या डोक्यावर छत्र नाही. अश्या बिकट परिस्थितीत बँकेत खाती काढणे
अशक्य असते. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ६५ शाळा असून पालिकेत नव्याने
समाविष्ट झालेल्या २७ गावातील शाळा अजूनही पालिकेच्या अंतर्गत नाहीत. २७ गावतील
शाळा जिल्हा प्रशासन चालवते. राज्य शासनाच्या नवीन अध्यादेशानुसार या शाळेतील
विद्यार्थ्यांना आधार कार्ड काढणे सक्तीचे राहणार नाही.याबाबत अधिक माहिती देताना
शिक्षण समितीचे सभापती विश्वदीप पवार म्हणाले,राज्य शासनाने
घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आहे.पालिकेच्या शाळेतील काही विद्यार्थ्याना राहण्यास
घर नाही. फुटपाथ , फलाटावर राहून हि मुले पालिकेच्या शाळेत
येत असतात. राज्य शासनाच्या नवीन अध्यादेशानुसार आता विद्यार्थ्यांना आधार कार्ड
शक्ती नसणार नाही.कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळेत सुमारे ९ हजार
विद्यार्थी शिकत आहेत. पालिकेच्या बजेटनुसार शिक्षण समितीसाठी असलेल्या सुमारे
साडे चार कोटी रुपयांमधील २ कोटी हे फक्त गणवेशसाठी खर्च होणार आहेत. याला मंजुरी
देण्यात आली असून निविदा प्रक्रिया आहे. येत्या २०१९ च्या शैक्षणिक वर्षापासून
पालिका अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहेत.
पालिकेतील निराधार असलेल्या २५ विद्यार्थ्याचे संस्थांनी
पालकत्व स्वीकारले....
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या २५
निराधार विद्यार्थ्यांचे पालकत्व एका संस्थेने स्वीकारले आहेत.
त्यामुळे या विद्यार्थ्यांना मायेची सावली मिळत असल्याने आता त्यांच्या शिक्षणात त्याची
परिस्थिती अडथळा ठरणार नाही. याच्या आदर्श घेऊन अनेक सामाजिक संस्थानी या
विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले पाहिजे असे मत शिक्षण समिती सभापती विश्वदीप
पवार यांनी सांगितले.
Post a Comment