शरद पवारांच्या वाढदिवसाला डोंबिवलीकर महिला प्रवाश्यांना खास भेट...
डोंबिवली रेल्वे स्थानकात पिकअवरला महिला स्पेशल गाडी सुरू होणार ...
डोंबिवली :- ( शंकर जाधव ) : मध्य रेल्वे स्थानकातील डोंबिवली हे स्थानका सर्वात जास्त गर्दीचे आणि जास्त उत्पन्न देणारे रेल्वे स्थानक आहे. मात्र रेल्वे प्रशासन येथील प्रवाश्यांना सुविधा देण्यास कानाडोळा करत असल्याचे दिसून आले आहे.वाढती गर्दी पाहता डोंबिवली स्पेशल लोकलची मागणी अनेक महिन्यासापासून रेल्वे प्रशासनाकडे प्रलंबित आहे.शुक्रवारी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकाची पाहणी केली. यावेळी अनेक प्रवाश्यांनी रेल्वेतून प्रवास करताना होत असलेला त्रास आणि रेल्वे प्रशासन होत असलेले दुर्लक्ष याची माहिती तपासे यांना दिली. पाहणी केल्यानंतर तपासे यांनी रेल्वे प्रबंधक के.बी. अब्राहम यांना जाब विचारला. महिला प्रवाश्यांच्या मागणीनुसार सकाळच्या वेळी महिला स्पेशल लोकल सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला विनंती करण्यात येणार असल्याचे यावेळी तपासे यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या वाढदिवसाला राष्ट्रवादीकडून डोंबिवलीकर महिला प्रवाश्यांना खास भेट मिळणार आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांच्यासह नीला पाटील,शोभा कोटियन,पूजा पाटील, स्मिता जाधव ,मधुकर शेळके,राजेंद्र नांदोस्कर, जगदीश ठाकूर, जवाहर मेहता, शैलेन्द्र भोजने, निरंजन भोसले, सेवादल भोसले, राम माने, प्रसन्न अचलकर, समीर गुधाटे,सचिन सोनावळे, उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख, रुखवते यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. फलाट क्रमांक १ आणि रेल्वे गाडीतील अंतर याची पाहणी केल्यानंतर तपासे यांनी प्रवाश्यांशी संवाद साधला. अपंगासाठी फलाट क्रमांक १ वर बंद असलेले स्वच्छतागृहबाबत काही प्रवाश्यांनी तपासे यांना सांगितले असता यावर मात्र रेल्वे उपप्रबंधक चांद यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. रेल्वे स्थानकाबाहेर रुग्णवाहिका नसल्याबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे उपप्रबंधक चांद यांना जाब विचारला. रेल्वेच्या जागेत असलेल्या पार्किंगची पाहणीहि यावेळी तपासे यांनी केली. त्यानंतर तपासे म्हणाले, डोंबिवली रेल्वे स्थानकातील सुविधांबाबत येथील रेल्वे प्रबंधक आणि जीआरपीकडून अनेक वेळेला पत्रव्यवहार केला होता. मात्र डीआरएम यावर काहीही अभिप्राय देत नाहीत. ठाणे ते लोणावळा पर्यत रेल्वेचे एकच रेल्वे न्यायालय आहे. या न्यायालयात हजारो केसेस दाखल होत असतात . त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मागणी करणार आहे कि, रेल्वे न्यायालयाची संख्या वाढवा.तसेच सकाळी गर्दीच्या वेळी कल्याण ते घाटकोपर अशी महिला स्पेशल लोकलहि सुरु झाली पाहिजे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या १२ डिसेंबर वाढदिवसाला डोंबिवलीत सकाळच्या वेळी महिला स्पेशल लोकल सुरु करण्यात यावी अशी मागणी करणार आहे. जर तसे झाले नाही तर राष्ट्रवादी मोठे आंदोलन करेल. यावेळी उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी थेट रेल्वे मंत्र्यांवर टीका करत रेल्वे मंत्री फक्त घोषणा करतात मात्र प्रत्यक्षात अंमलात आणत नसल्याचे सांगितले. ५ आणि ६ फलाटासाठी ९ किलोमीटरचे ट्रॅक टाकण्याचे काम डिसेंबर २०१७ पर्यत होणे आवश्यक होते.मात्र रेल्वे प्रशासन वेळकाढू भूमिका करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.दरम्यान, डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०१८ पर्यत रेल्वे अपघातात १५७ बली पडले तर ९१ जन जखमी झाले असल्याची माहिती यावेळी वपोनी सुरेश पवार यांनी सांगितले. तर ४५२ विविध गुन्हे दाखल झाले आहेत.
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्र.१ वरील आकस्मित चिकित्सा कक्ष गेल्या तीन महिन्यापासून बंद आहे. याबाबत तपासे यांनी रेल्वे उपप्रबंधक चांद यांना सदर कक्ष लवकरात लवकर सुरु करण्याची विनंती केली.
Post a Comment