भव्य मोफत आरोग्य तपासणी महाशिबिर संपन्न
तब्बल १६३ नागरिकांनी केली आरोग्य तपासणी
रायगडावरील माती उपस्थितांना भेट देण्याच्या अभिनव कल्पनेचे भरभरून विशेष कौतुक
टिटवाळा:- संभाजी ब्रिगेड टिटवाळा शहर व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी महाशिबिर विद्यामंदिर शाळा, मांडा टिटवाळा येथे आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवत तब्बल १६३ नागरिकांनी यावेळी आरोग्य तपासणी केली.
महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिरास सुरुवात करण्यात आली.सदर शिबिरात हृदयरोग,ईसीजी, रक्तदाब,अँजिओप्लास्टी,बायपास सर्जरी,मुतखडा,मूत्रमार्गविकार, हाडांचे विकार,कॅन्सर,सांधे व फुफुसाचे आजार, अस्थमा, नेत्रतपासणी,अनियंत्रीत शुगर उपचार, मान,पाठ, कंबरदुखी, प्यारॅलीसेस,चक्कर येणे, डोकेदुखी,जीर्ण व्याधी आजार,दंत तपासणी,अपंग व्यक्तींची तपासणी,स्त्री रोग,एच आय व्ही तपासणी,लहानमुलांची तपासणी,गरोदर स्त्रियांची तपासणी,मासिक पाळीच्या वेळीच्या समस्या,इ.ची तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली.
सदर शिबिरास कंडोमपाच्या उपमहापौर उपेक्षा भोईर, माजी नगरसेवक सुरेश भोईर, माजी नगरसेवक मयूर पाटील, बिजेपी मोहना सरचिटणीस शक्तीवान भोईर,संभाजी ब्रिगेडचे डोंबिवली शहर अध्यक्ष दिपक भालेराव, सं.ब्रि.चे अश्रू ठोके, जेष्ठ समाजसेवक विवेक कानेटकर,टिटवाळा डॉक्टर वेल्फेअरचे असोसिएशनचे अध्यक्ष योगेश कवठे, गजानन काळण, दिलीप राठोड,वैदेही नांदगावकर,बीजेपी मोहने पदाधिकारी वेदावती शेट्टी,मनसेचे मिलिंद लाड,लक्ष्मी आहिरे,संदीप नाईक,महेंद्र हाडवळे, यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. सदर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे क.डो.महानगर अध्यक्ष प्रभाकर भोईर,कार्याध्यक्ष रमेश फुंदे,रेड स्वस्तिकचे प्रमोद नांदगावकर व सहकारी तसेच आम्ही मांडेकरचे कल्पेश पाटील, साई एकवीरा बाल मंडळ,अतुल शिंपी,क्षितिज टपाल,संदीप सलपे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या शिबिरातील उपस्थितांचे स्वागत एका विशेष पद्धतीने करण्यात आले. सदरील कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांना आरोग्याचं प्रतिक म्हणून तुळशीचं रोप, शाल,श्रीफळ आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली रायगडावरील माती, देऊन करण्यात आले. तर सदरील शिबिरास सहकार्य केलेल्या नागरिकांना संभाजी ब्रिगेड तर्फे सहकार्य पत्र देण्यात आले. शिबिरास जमलेल्या नागरिकांनी सदरील उपक्रमा बाबत आभार व्यक्त करीत आयोजकांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याच बरोबर रायगडावरील माती उपस्थितांना भेट देण्याच्या अभिनव कल्पनेचे भरभरून विशेष कौतुक केले.
Post a Comment