राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक स्थानिक पदाधिका-र्यांच्या गटबाजीला थांबिण्यात यशस्वी ठरतील का ?
डोंबिवली :- ( शंकर जाधव)
कल्याण -डोंबिवलीत राष्ट्रवादी नागरिकांच्या समस्या , विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांवर जोरदार टीका आणि पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळी शहरात येत आहेत.मात्र पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी दूर करून त्यांना एकत्र आणण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गणेश नाईक यांच्यावर सोपवली असल्याचे डोंबिवलीत सांगितले होते.आता गणेश नाईक पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी थांबवितील का हे लवकरच दिसेल.उद्या मंगळवारी सकाळी ११ वाजता डोंबिवली पूर्वेकडील देसले पाडा, भोपर रोड येथे राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक हे श्री समर्थ सी.एन.जी.प्युअल स्टेशनच्या उद्घाटनासाठी येणार आहेत.
Post a Comment