राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे करणार डोंबिवली रेल्वे स्थानकाची पाहणी...
डोंबिवली :- ( शंकर जाधव )
मध्य रेल्वे स्थानकातील सर्वात जास्त उत्पन्न देणाऱ्या डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाश्यांना प्रवास करणे जीवघेणे ठरत आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या रेल्वे गाडीत प्रवाश्यांना बसण्यास जागा मिळत नसल्याने ड काही प्रवासी कल्याण रेल्वे
स्थानकात जाऊन मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या लोकलने प्रवास करणे पसंत करतात.तर दिवा रेल्वे स्थानकात
जलदगतीच्या रेल्वे गाड्यांना थांबा दिल्याने गर्दीत दिवसेंदिवस अधिकाधिक वाढ होत आहे.डोंबिवलीतील भावेश नकाते आणि
धनश्री गोडवे हे रेल्वे गाडीतील गर्दीचे बळी ठरले होते.यावर उपाययोजना करण्यास रेल्वे प्रशासन फक्त कागदी घोडे नाचवीत आहे.
डोंबिवलीतील फलाट आणि रेल्वे गाडी मधील अंतर, महिलांसाठी विशेष लोकल, धोकादायक रेल्वे पुलाचा प्रश्न या व अश्या अनेक
समस्यांचा जाब विचारण्यासाठी आणि डोंबिवली रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे हे
उद्या गुरुवार २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता येणार आहेत.यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
Post a Comment