दुबईतील आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत डोंबिवलीतील पेसमेकर्सचा प्रथम क्रमांक..
डोंबिवली :- दि.२२ ( शंकर जाधव ) दुबईतील हार्टलँड इंटरनॅॅशनल शाळेत पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत डोंबिवलीतील पेसमेकर डान्स अकादमीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.या स्पर्धेत भारताला पहिल्या क्रमांकाचे स्थान पेसमेकचे योगेश पाटकर आणि विद्यार्थ्यांनी मिळवून दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.योगेश पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कश्मिरा भोईर,राज चव्हाण,अनुज यादव,सिद्धेश करकेरा,देवश्री महाडिक.दिशा चौधरी,रश्मिता चित्रे,मिली शहा,अस्मी शहा,श्र्लोक कदम,मिहीर चौधरी,अंकीथ कैवल्य, हर्षल शेट्टी, सानिका सौदेकर, निष्ठा भोईर या मुलांनी स्पर्धेत भाग घेतला आहे
पदन्यास एन्टरटेमेंटच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेत भारतासह आफ्रिका, कोरिया आणि चीन या देशातील सुमारे ७५० स्पर्धकांनी भाग घेतला होता. दुबईत हार्टलँड इंटरनॅॅशनल शाळे त या स्पर्धेची रंगतदार फेरी झाली.स्पर्धेत पेसमेकरर्सनी `एबीसीडी`चित्रपटातील `हे गणराया` या नृत्यावर आपली कला सादर केली.विशेष म्हणजे या नृत्याच्या सरावादरम्यान दोन स्पर्धकांच्या हाताला मार लागला होता.हाताला फॅकचर करावे लागले.एका स्पर्धकाला सरावादरम्यान दुखापत झाल्याने डोक्यावर पाच टाके घालावे लागले.मात्र कल्याण-डोंबिवलीच्या जिद्दी मुलांनी या वेदना सहन करत आपल्या नृत्यावर लक्ष दिले.त्यांच्या या जिद्दीचे परीक्षकांनी कौतुक केले.या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी कल्याण-डोंबिवलीचे १५ विद्यार्थी योगेश पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिनाभर सराव करत होते.कंटेम्परी,हीप हॉप आणि सेमी क्लासिकल अशा स्वरूपाच्या नृत्य प्रकारचा या स्पर्धेत सहभाग होता.या सर्वात पेसमेकरने केलेल्या स्टेप्स या नाविन्यपूर्ण ठरल्या.या स्पर्धेसाठी प्रसिद्ध नृत्यांगना सुधा चंदन आणि मेलवीन लुईस यांनी परीक्षक म्हणून काम पहिले.या मुलांना ट्रॉफी आणि तीन लाख रोख रक्कम अशा पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
Thank you
ReplyDeletePost a Comment