पु.भा.भावे
सांस्कृतिक सभागृहाचा भूखंड पालिकेला हस्तांतरित प्रस्ताव शासनाच्या लालफितीत
अडकला..
शासनाची अनास्था
असल्याचा नगरसेवक शैलेश धात्रक यांचा आरोप
डोंबिवली :( शंकर
जाधव )
डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा फुले
रोड नजीक पु,भा.भावे सांस्कृतिक सभागृहाची उभारण्यात आलेली इमारत धोकादायक झाली
आहे. गेली अनेक वर्षापासून इमारतीच्या नूतनीकरणाच्या मागणीसाठी भाजपाचे स्थानिक
नगरसेवक शैलेश धात्रक यांच्यासह सर्वच राजकिय पक्षांंनी पालीका प्रशासनाकडे पत्र
व्यवहार केला होता. पालिका प्रशासनाकडून या इमारतीच्या नुतनिकरनासाठी दरवषी
पालिकेच्या अर्थसंकल्पात लाखो रुपयाची कागदोपत्री तरतूद केली जाते.मात्र सदर
वास्तूची जागा कलेक्टर लॅॅन्ड आहे. त्यामुळे या इमारतीच्या जागेचा भूखंड पालिकेला
हस्तांतरित करण्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविलेला प्रस्ताव जिल्हाधिकारी
कार्यालयात गेली अनेक महिने धुळ खात पडून आहे .त्यामुळे पु.भा.भावे सांस्कृतिक भवन
इमारतीच्या नुतनीकरनाला तिढा सुटणार तरी कधी असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पालिका प्रशासनाच्या वेळखाऊ पणामुळे या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी पालिका
प्रशासना कडून कोणतेच ठोस पावले उचलली जात नसल्याने सदरची इमारत अद्यापही मरणासन्न
अवस्थेत अखेरची घटका मोजीत आहे
डोंबिवली पश्चिमकडील महात्मा फुले रोड येथील साहित्यिक पु.भा.भावे
सभागृह यांच्या नावाने पु,भा.भावे सांस्कृतिक सभागृहाची इमारत उभारण्यात आली.या दोन मजली
इमारतीत तळमजल्यावर सभागृह असून त्या ठिकाणी निवडणूक विभागाचे कार्यालय
आहे.पहिल्या माळ्यावर तलाठी कार्यालय असून या तलाठी कार्यालयात ऑनलाईन सेतू सेवा
उपकेंद्र सुरु आहे. असल्याने तलाठी कार्यालया संबधित व सेतू सेवा उपकेंद्रात विविध
दाखल्यासाठी व कामकाजासाठी नागरिकांची वर्दळ असते. व आजही हि कार्यालये सुरु असून
येथे आपल्या काम काजा दुसऱ्या मजल्यावर पालिकेची हिंदी माध्यमाच्या प्राथमिक शाळा आहे.
मात्र ही इमारत धोकादायक असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका असल्याने गेल्या वर्षा
पासून पालिकेची शाळा अन्य ठिकाणी स्थलांतरित केली आहे.हि धोकादायक इमारत
पाडून या इमारतीच्या जागी नव्याने संस्कृतीक सभागृहाची इमारत उभारावी अशी मागणी
गेल्या अनेक वर्षा पासून पालिका प्रशासनाकडे स्थानिका नगरसेवक शेलेश धात्रक यांनी
पालिका दरबारी केली होती .पालिका प्रशासनाने हि या धोकादायक सभागृहाची इमारत पाडून
त्या जागी या बहुउद्देशीय सभागृह उभारण्यासाठी पालिकेच्या अर्थ संकल्पीय अंदाज
पत्रकात दर वर्षी कोट्यावधी रुपयांची तरतूद करून ठेवलेली आहे.मात्र या सभागृहाच्या
इमारतीचा भूखंड पालिका प्रशासनाच्या ताब्यात नसून शासनाच्या जिल्हाधिकारी
विभागाच्या मालकीचा आहे.सदरचा भूखंड पालिकेला हस्तांतरित करण्याचा
प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे.पु.भा.भावे सांस्कृतिक
केंद्र सभागृहाच्या जमिनीचा भूखंड पालिका प्रशासनाला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव
मार्गी लागण्यासाठी स्थानिका नगरसेवक धात्रक यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात
पाठपुरावा करून गेल्या अनेक महिन्यापासून सदरचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी
जिल्हाधिकारी कार्यालयातून कोणतीच हालचाली होताना दिसत नाही. हि इमारतीत
हस्तांतरित होत नसल्याने सदरचा प्रस्ताव शासनाच्या लालफितीत अडकून पडला असल्याने
थोर साहित्यिकाच्या नावाने बहुउद्देशीय सभागृह उभारण्यासाठी शासनाच्या अनास्थेबाबत
भाजपा नगरसेवक धात्रक यांनी खंत व्यक्त केली आहे.
Post a Comment