गावातील
रस्त्यामुळे विकासाला चालना मिळते- रमेश म्हात्रे
डोंबिवली :- ( शंकर जाधव ) कोपर रेल्वे स्थानक मध्य रेल्वेच्या मार्गावरील अत्यंत महत्त्वाचे
जंक्शन म्हणून नावारुपाला येत आहे.त्यामुळे दळणवळण वाढणार आहे.त्यासाठी पायाभूत
सुविधा उपलब्ध झालेल्या पाहिजे.गावातील रस्ते मोठ्या रस्त्याला जोडले गेले पाहिजे.
गावातील रस्त्यामुळे विकासाला चालना मिळते.म्हणून गावातीलच रस्ते विकसित व्हायला
हवेत. पर्यटनाच्या दृष्टीने
कोपरचा खाडीकिनारा उपयुक्त आहे.
त्याकडे जाणारे रस्ते योग्य हवेत. कोपर गावातील सर्व रस्ते कांक्रिटचे होणार आहेत.
प्रभागातील १४ जागा हायमॅक्सच्या
दिव्यांनी उजळून निघणार आहे. कोपर
स्टेशन मध्ये होम प्लॅटफॉर्म लवकरच तयार होत आहे असे स्थायी समितीचे माजी सभापती
तथा जेष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी कोपरगावातील रस्त्याचे डांबरीकरणाच्या
भूमीपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी सांगितले. यापूर्वी कोपरगाव प्रभागातील रस्त्याचे
डागडुजीकरण ग्रामपंचायत असताना करण्यात आले होते.
कोपरगावातील सुक-या
शिवा चौक व लक्ष्मण पावशे चौकात भूमीपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला होता. कोपरगाव
प्रभागातील रस्त्याचे डागडुजीकरण ग्रामपंचायत असताना करण्यात आले होते.या
रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.आजच्या भूमीपूजनच्या कार्यक्रमात जेष्ठ
नगरसेवक तथा माजी सभापती रमेश म्हात्रे, सहायकअभियंते प्रशांत भुजबळ, कंत्राटदार तुळशी
खेमचंदाणी, शिवसेना शहर संघटक किरण मोंडकर, नाना सहस्त्रबुध्दे, रेल्वे अधिकारी
संजय गुप्ता, पोलिस पाटील शिवाजी पाटील,शाखाप्रमुख तृप्ती देसाई, अनंता म्हात्रे, हिराबेन वाघेला,गुरव इत्यादी
मान्यवर उपस्थित होते. महिला बचत गटाच्या महिला हिंदी भाषिक परिषदेचे सदस्य, अयप्पास्वामी सेवा
संघाचे कार्यकर्ते कोपरगाव जेष्ठ नागरिक संघ, निरंकारी समाजाचे भक्तगण उपस्थित होते.सदर
रस्ता हा विकास आराखड्यात नसून २१० नियमानुसार या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात
आहे. २०० मीटर या रस्त्याची लांबी आहे. तर ६ मीटर रुंदी आहे. सुमारे १ कोटी
रुपये या कामासाठी खर्च होणार असून महिना भरात काम पुर्ण होईल.तसेच संपूर्ण
रस्त्याच्या कडेला स्लब असलेल्या सिमेंटच्या भूमिगत गटाराचे काम करण्यात येणार
आहे. त्यामुळे पावसाळ्यातील पाण्याचा आणि सांडपाण्याचा निचरा होईल अशी माहिती
प्रशांत भुजबळ यांनी दिली.
Post a Comment