डोंबिवली - तळोजा मेट्रो वादाच्या भोवऱ्यात......
भाजपचे अभिनंदनाचे बॅनर तर शिवसेनेचा आक्षेप...
डोंबिवलीकरांना मूर्ख बनवीत असल्याचा मनसेचा आरोप...


( डोंबिवली- प्रतिनिधी शंकर जाधव ) : 
 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कल्याण येथे कल्याण- तळोजा मेट्रोचे उदघाटन समारंभ पार पडला.यावेळी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि राज्यमंत्री रविंद चव्हाण यांनी कल्याण- डोंबिवली तळोजा असा मेट्रोचा मार्ग सुरू करणार असल्याचे जाहीर केले.तर कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीएकडून मंजूर डीपीआर  मध्ये बदल झाल्याचा आरोप केला आहे.सत्तेतील या दोन्ही मित्र पक्षांचा मनसेचे प्रदेश  उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी खरपूस समाचार घेत डोंबिवलीकरांना हे दोन्ही पक्ष मूर्ख बनवीत आल्याची टीका केली.
 
    खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए बरोबर झालेल्या बैठकीत जो मार्ग निश्चित करण्यात आला होता,  तो अचानक बदलला गेला.त्यामुळे  डोंबिवलीकरांनासकट अनेक गावांना मेट्रोच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे. कल्याण- तळोजा असा मेट्रो मार्ग निश्चित केल्यास शीळ फ़ाटा व इतर गावांना याचा लाभ मिळणार नाही असे सांगितले.तर डोंबिवलीचे आमदार तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कल्याण-तळोजा मेट्रोचा लाभ डोंबिवलीकरांना व्ह्यावा म्हणून कल्याण येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याकडे मागणी केली होती.त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ होकार दिला.दरम्यान भाजपने याबाबत अभिनंदनाचे बॅनर शहरात लावले आहे. यावर मनसे उपाध्यक्ष राजेश कदम म्हणाले, हे दोन्ही प्रकल्प विकासकाच्या फायद्याचे असून मेट्रो मार्गिकेजवळ भाजपच्या एका मोठ्या बिल्डरांचा प्रकल्प सुरू आहे.त्यासाठी त्याने जागा घेऊन ठेवली आहे.दिल्लीत ही या मेट्रोचा रिमोटद्वारे शुभारंभ करता आला असता.मात्र हा शुभारंभ म्हणजे भाजपची ओसरू लागली लाट  सावरण्याचा प्रयत्न आहे.डोंबिवलीकरांना मूर्ख समजू नका, ते याची परतफेड केल्याशिवाय ते राहणार नाही १०० दिवसावर आलेल्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी श्रेयाच्या लढाईची सुंदोपसुंधी नियोजित  मेट्रो प्रकल्पामुळे दिसून येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post