तन्मय राँयल साई सिध्दी संघाने पटकावला कै. नामदेव स्मृती चषक
डोंबिवली : ( शंकर जाधव ) गावदेवी क्रीडा मंडळ व शिवसेना विभागीय शाखा क्र. १५ च्या वतीने कोपर गाव येथील कै. सुदाम कान्हा म्हात्रे मैदानात पार पडलेल्या बाॅक्स क्रिकेट मर्यादित षटकांचा अंतिम सामना तन्मय राँयल साई सिध्दी संघ आणि रिया इलेवन यांच्यात
चांगलाच रंगला.या सामन्यात तन्मय राँयल साई
सिध्दी संघ विजयी ठरला.
या संघाने कै. नामदेव स्मृती
चषक व रोख ९९,९९९. व उपविजेता रिया इलेवन संघास कै. नामदेव स्मृती
चषक व रोख ५५,५५५ चे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
या सामन्यात दिनेश दळवी हा खेळाडू हा मालिकावीर ठरला. उत्कृष्ट फलंदाज आनंद लोके,
उत्कृष्ट गोलंदाज घनश्याम शिंदे यांना बहुमान मिळाला.अंतिम सामन्यानंतर तन्मय राॅॅयल साई सिध्दी संघ व रिया इलेवन या संघामध्ये अंतिम सामना खेळला
गेला.भगवमय वातावरणात सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी गर्दी केली होती.अंतिम सामन्यात तन्मय राॅयल साई सिध्दी संघातील फलंदाजाने उत्कृष्ट चौकार ठोकून ७५ धावांचे आव्हान रिया
इलेवन समोर उभे केले.मात्र आव्हानापुढे रिया
इलेवन ठेपाळला.यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती तथा
ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, मनोज म्हात्रे, प्रवीण म्हात्रे, डॉ.शैलेद्र,
पांडुरंग म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश गायकवाड, उपशहरप्रमुख किशोर मानकामे,बंडू
पाटील,अनंता म्हात्रे, विशाल म्हात्रे,महिला विभागप्रमुख हिराबाई वाघेला आदीसह
अनेक पदाधिकारी उपस्थित होते.समालोचक प्रसाद परब, नितीन काळण,पंच म्हणून पद्नाथम
प्रभू, अजित निकम, भालचंद्र म्हात्रे व विनोद शर्मा यांनी काम पहिले.सहा दिवसीय
सामन्यात जीएम स्पोर्ट अकादमीच्या १४ वर्षाखालील बच्चेकंपनीचा विशेष सामन्याचे आयोजन
करण्यात केले होते. या विशेष सामन्याचे समालोचक शुभांग राऊत या लहान मुलाने केले.या
मुलांचा सामना पाहताना उपस्थित प्रेक्षकवर्गहि भारावून गेला.
Post a Comment