डोंबिवलीत २० टक्के विना परवाना रिक्षा रस्त्यावर...
डोंबिवली : (शंकर जाधव ) डोंबिवलीत मोठया प्रमाणात रिक्षा
असून रिक्षा चालकांमुळे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत
असते.फुटपाथवर आणि रस्त्यावर बसणारे
फेरीवाले, असल्याने रिक्षा चालकांना जागा मिळत नाही. तसेच स्टेशन
परिसरात अनधिकृत रिक्षा वाहनतळ असल्याने
वाहतूक कोंडीत भर पडत आहे डोंबिवलीत सुमारे ८ ते १० हजार रिक्षा असून यापैकी सुमारे २० टक्के म्हणजे ५०० रिक्षा विना परवाना रस्त्यावर धावत
असल्याचे उघड झाले आहे
.
रिक्षा
चालकांच्या बेशिस्त वर्तनामुळे नागरिकच नाही
तर वाहतूक पोलीसही त्रस्त झाले आहेत.रिक्षा चालकांच्या विविध राजकीय पक्षांच्या संघटना आहेत.बेशिस्त रिक्षा चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तर राजकीय
पक्षाचे नेते पोलीस खात्यावर दबाव आणून कारवाई करण्यापासून रोखतात.यामुळे रिक्षा चालकांना शिस्त कशी लावणार असा सवाल पोलीस करत आहेत.बाजी
प्रभु चौक,पाटकर रोड,केळकर रोड,इंदिरा
चौक फत्तेअली रोड,अशा विविध रस्त्यांवर मोठया प्रमाणात अनधिकृत
रिक्षा तळ करण्यात आले
आहेत त्याशिवाय इंदिरा चौकात पाटकर रोड व बाजीप्रभु चौक येथून मानपाडा रोडला
जाणार्या रिक्षा एकाच दिशेने वेगाने धावतात वाहतूक पोलीसही याकडे दुर्लक्ष करत
असल्याने ज्येष्ठ नागरिक,महिला,शालेय
विद्यार्थी,इतर नागरिकांनी रस्ता ओलांडना करताना जिव मुठीत घेऊन पार करावा लागत आहे वाहतूक पोलींसाना विचारले असता ते एक दिशा करण्यासाठी
वरिष्ठांची परवानगी आवश्यक असल्याचे सांगण्यात येते. डोंबिवलीतील काही रिक्षाचालक बेशिस्त आहेत.डोंबिवलीत
आठ ते दहा हजार रिक्षा असून त्यापैकी सुमारे २० टक्के रिक्षा विना परवाना,व
गणवेश नसलेले वाहक आहेत. या
विरुध्द कडक कारवाई सुरु केली आहे. गेल्या
पाच माहिन्यात ७९२५ विना परवाना असलेल्या रिक्षा चालकांवर कारवाई असून त्याच्याकडून १५ लाख रुपये दंडात्मक रक्कम वसूल
केली असून यामुळे विना परवाना रिक्षा आता कमी होत असल्याचा दावा डोंबिवली वाहतूक
पोलीस विभागाचे वपोनि सतीश जाधव यांनी केला आहे.
Post a Comment