३१  डिसेंबरच्या पूर्वसंंध्येला  राज्य उत्पादन विभागाची धडक कारवाई..... 
                 डोंबिवली :-  ( शंकर जाधव  ) राज्य उत्पादन विभाग ठाणे ,भरारी पथक यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीतील टाटा पॉवर नाका व अंबरनाथ येथे अनधिकृत गावठी दारू १३४०  लिटर्स व इतर ४०००  लिटर्स रसायन जाळून नष्ट करण्यात आले.३१  डिसेंबरच्या पूर्वसंंध्येला ही धडक कारवाई करण्यात आली याशिवाय ६५०० बॉटल बियर,अनधिकृत धाबे उध्वस्त करण्यात आले असा एकूण १ लाख ७१ हजार  रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला विभागीय आयुक्त साळूखे ,निरीक्षक मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

Post a Comment

Previous Post Next Post