कल्याणच्या नवीन पत्रिपुल उभारणीसाठी लागणार वर्षभराचा कालावधी... 

कल्याण :- ( शंकर जाधव ) 
 कल्याण पश्चिमेचा  आमदार नरेंद्र पवार यांनी पत्रिपुलाच्या कामाच्या  पाहणी दौऱ्यात रेल्वे विभागाकडून काही तांत्रिक परवानग्या मिळण्यास विलंब होत असल्याने पूल पूर्ण होण्यास अजून एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याची माहिती समोर आली.   त्यामुळे नागरिकांना अजून वर्ष भर तरी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे दरम्यान आमदार पवार यांनी हा पूल लवकरात लवकर उभारण्यासाठी शासनाकडे पाठपुरवा करन्यात येईल आणि रेल्वेला जे काही मदत लागणार आहे ती मदत मी आणि खाजदार कपिल पाटील करणार आहोत असे आश्वासन यावेळी आमदारांनी  दिले.

रेल्वेने धोकादायक ठरवलेला १०४  वर्षे जुना कल्याणचा जुनापत्रिपुल १८  नोव्हेम्बर रोजी तोडण्यात आला, त्यानंतर जुना पत्री पुलाशेजारील पुलावरून दोन्ही बाजूनी वाहतूक सुरू आहे  .मात्र दोन पदरी असलेल्या या पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असून नेतीवली ते बैलबाजार पर्यन्त वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येतात ,त्यामुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे पाडण्यात आलेल्या जुना पत्रिपुलाच्या जागी लवकरात लवकर नव्याने पूल उभारण्याची मागणी वाहतूक कोंडीने त्रस्त नागरिकांकडून होत आहे . वाहतुकीचा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणार अंदाजे १०० वर्षापूर्वीचा पत्रीपूल पाडल्या नंतर  जवळपास महिनाभर उलटुन गेल्यानंतरही काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याचे आमदार नरेंद्र पवार यांच्या निदर्शनास आले. जुना पुल पाडल्याने वाहतुकीचा संपूर्ण भार हा बाजूलाच असणाऱ्या नव्या पुलावर आल्याने प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांना करावा लागत आहे. वारंवार विचारणा करूनही अधिकारी वर्ग सविस्तर माहिती देत नसल्याने आमदार नरेंद्र पवार यांनी स्वतःच थेट पत्रीपुलाच्या बांधकाम परिसराला भेट देऊन सद्य परिस्थितीचा आढावा घेतला.यावेळी एमएसआरडीसीचे उपअभियंता अनिरुद्ध बोरडे, कंत्राटदार दीपक मंगल, सल्लागार एल. एन.मालविया आदी अधिकारी उपस्थित होते दरम्यान सबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनाही पाचारण करत प्रत्यक्ष कामाची स्थिती जाणून घेतली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी रेल्वे विभागाकडून काही तांत्रिक परवानग्या मिळण्यास विलंब होत असल्याने पूल पूर्ण होण्यास अजून एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याची शक्यता संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. कोणत्याही ठिकाणी अडचण येत असेल तर कधीही आपल्याशी संपर्क करा मी स्वतः व खासदार कपिल पाटील शक्य ती सर्व मदत करू मात्र पूल तातडीने पूर्ण करून कल्याणची वाहतूक समस्या सुटली पाहिजे यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

Post a Comment

Previous Post Next Post