सर्व पक्षिय युवा मोर्चा संघटना भूमिपूजन कार्यक्रम स्थळी घोषणाबाजी...
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिंदे देणार लेखी आश्वासन...
डोंबिवली :( शंकर जाधव ) बहुचर्चित भिवंडी-कल्याण-शिळ
रस्त्याचे भूसंपादनाची कोणतीही प्रक्रिया पुर्ण न करता दुपदरी, चौपदरी आणि आता सहापदरी रूंदिकरण सुरू असली तरी या रस्त्यातील संपादीत जमीनींची मालकी ही आजही शेतकऱ्यांकडेच आहे. या रस्त्याचे खरे मालक शेतकरी असतांना त्यांना कोणताच मोबदला न देता राज्य रस्ते विकास महामंडळ प्रशासनाने रविवारी पलावा सिटी निळजे व देसाई येथे तातडीने सहापदरी रस्ता व उन्नत मार्गाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजीत केला असल्यामुळे बाधित शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. यांचा निषेध करण्यासाठी सर्
राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी संपादीत जमीनींना मुबलक प्रमाणात मोबदला दिला जात असतांना मुंबई महानगरातील मुळनिवासी भूमिपुत्र असलेल्या आगरी कोळी समाजाला हेतूपुरस्सरपणे डावलले जात आहे .कल्याण तालुक्यातील स्थानिकांच्या उदरनिर्वाहाच्या शेतजमिनी एमआयडिसी, रस्ते,रेल्वे,विद्युत वाहीन्या व प्रिमीयर कंपनीसाठी कवडीमोल भावाने संपादीत केल्या असल्याने येथील रहिवाशी विकासापासुन वंचितच राहीला. विकास मात्र येथील भांडवलदारांचा झाला.येथील भूमिपुत्रांचा विकासाला विरोध नसून आपल्या जमीनीचा समाधानकारक मोबदला मिळावा हीच माफक अपेक्षा आहे.भिवंडी-कल्याण-शिळ रस्त्यातील संपादीत जमीनींची मालकी ही आजही शेतकऱ्यांकडेच असल्याने या रस्त्याचे खरे मालक शेतकरी असतांना टोल वसुली मात्र राज्य रस्ते विकास महामंडळा कडून केली जात आहे.यासाठी जनतेचं शासन शेतकऱ्यांना न्याय देत नसेल तर शेतकऱ्यांना न्यायदेवतेचा दरवाजा ठोठावा का असा सवाल उपस्थित केला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा मंत्री हे या भागाचे पालकमंत्री असूनही रस्ता बाधितांना मोबदला न देता राज्य रस्ते विकास महामंडळ प्रशासनाने रविवारी पलावा सिटी निळजे व देसाई येथे तातडीने सहापदरी रस्ता व उन्नत मार्गाच्या भूभिपूजनाचा कार्यक्रम आयोजीत केला होता.याचा निषेध सर्व पक्षिय युवा मोर्चा संघटना सलग्न- आगरी कोळी भूमिपुत्र महासंघाच्या वतीने शेकडो बाधित शेतकरी भूमिपूजन कार्यक्रम स्थळी काळे झेंडे दाखवून जाहीर निषेध नोंदविणार होते. याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम ( उपक्रम ) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्याला फोनवरून संपर्क केला. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल असे लेखी आश्वासन देऊ असे सांगितल्यानंतर संघटनेने काळे झेडे दाखविले नाही. मात्र घोषणाबाजी करून आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी गजानन पाटील, संतोष केणे, गणेश म्हात्रे,बाबाजी पाटील,प्रेमनाथ पाटील, हिरा पाटील सुधीर पाटील,प्रकाश पाटील,अरुणा पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
-
Post a Comment