डोंबिवली रेल्वे पुलाखाली कचऱ्याला आग...
डोंबिवली मध्य रेल्वे विभागीय प्रबंधकांच्या आदेशाकडे दुर्लक्ष ...
डोंबिवली : ( शंकर जाधव ) ९ संप्टेबर रोजी मध्य रेल्वे विभागीय प्रबंधक संजय जैन यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकाची पाहणी केली होती.यावेळी स्थानकातील अस्वच्छतेबाबत अधिकारी आणि ठेकेदारांची कानउघडणी केली होती. रेल्वे पुलाखाली फेरीवाल्यांचा साठलेल्या कचरा, वायर,मातीचे ढिगारे लवकरात साफ करा असे आदेशहि दिले. जे कर्मचारी काम निट करत नाही त्यांना कारणे दाखवा नोटीस द्या असे यावेळी सांगण्यात आले होते. मात्र त्यांच्या आदेशाकडे लक्ष दिले नसल्याने रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास रेल्वे पुलाखाली कचर्याला आग आगली.आग भडकली असती तर रेल्वे स्टेशनबाहेर आहाकार मजला असता. मात्र पालिकेच्या फेरीवाला अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणली. त्यानंतर काही वेळाने अग्निशमक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.
रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे पुलाखालील कचऱ्याला अचानक आग लागली. आगीच्या ज्वाळा रस्त्यापर्यत येत असल्याचे पाहून पालिकेच्या`ग`प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत, फेरीवाला अतिक्रमण विभागाचे प्रथक प्रमुख बाजीराव आहेर, अनिल वाल्मिकी,श्याम जाधव, मिलिंद शिंदे, कमलाकर सोनावणे, अशोक नागवंशे आणि जागरूक नागरिक राजू वाल्मिकी यांनी सदर ठिकाणी पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान ९ संप्टेबर रोजी मध्य रेल्वे विभागीय प्रबंधक संजय जैन यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकाची पाहणी केली होती. यावेळी रेल्वे पुलाखालील कचरा लवकरात लवकर साफ करा असे आदेश दिले होते.मात्र जैन यांच्या आदेशाकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हि घटना घडली. आता यावर रेल्वे प्रशासन काय उत्तर देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तीन वर्षापूर्वी याच ठिकाणी लागली होती आग...
डोंबिवली रेल्वे पुलाखालील कचऱ्याला तीन वर्षापूर्वी आग लागल्याची घटना घडली होती.पुन्हा एकदा सदर ठिकाणी आग लागल्याने आतातरी रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीऱ्याने लक्ष दिले पाहिजे अशी मागणी रेल्वे प्रवाश्यांकडून केली जात आहे.या घटनेला जबाबदार असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यावर रेल्वे प्रशासन काय कारवाई करतील हे लवकरच दिसून येईल.
Post a Comment