सामाजिक
बांधिलकी जपत साजरा केला समाजसेविका सुनिता ताई काटकर यांचा वाढदिवस
पालघर : वैतरणा नगर वाडा पालघर येथे आदिवासी विद्यार्थ्यांना बूट सैंडल हेअर बँड बांगड्या व खाऊ वाटप
करून सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला
समाजसेविका सुनिता ताई काटकर यांचा
वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
सुनिता ताई नेहमीच खेड्यापाड्यातल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तक, कंपास बॉक्स, टिफिन बॉक्स पाटी, पेन,
पेन्सिल, स्टीलचे भांडे अशा वस्तूंचे वाटप करीत असतात. जून महिन्यात वह्या वाटप करायला गेलेला
असताना मुलांच्या पायात कधीच चप्पल बूट नसलेले पाहिले आणि त्यांनी मुलांना
सांगितले पुढच्या वेळेस येताना तुम्हाला
बूट चप्पल घेऊनच येणार आणि ठरल्याप्रमाणे आपल्या
वाढदिवसानिमित्त त्यांनी मुलांसाठी खाऊ ,
खेळणी आणि बूट चप्पल याचे वाटप केले या कार्यक्रमासाठी डोंबिवलीहून
ज्येष्ठ समाजसेवक दिनेश भाई सेठिया, आरोग्यविषयक काम करणारे जितूभाई पाटील सर, चारू मॅडम, तसेच गावचे सरपंच *आत्माराम मडवी, उपसरपंच अनिल साळुंखे, शाळा
व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप ठाणेकर, उपाध्यक्ष किशोर पवार, गवरापूर शाळेचे
धनंजय सावंत सर, मुख्याध्यापक सखाराम नांगरे सर, ग्रामपंचायत सदस्य विनया ठाणेकर,
महिला मंडळाच्या साक्षी साळुंखे, मुख्याध्यापक दिनेश गोतारणे सर, सहशिक्षक प्रशांत
तरसे सर, जयवंत जाधव सर उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक दिनेश गोतारणे सरांनी व
त्यांच्या सहकाऱ्यांनी केक आणून फुलांची सजावट करून आदिवासी पाड्यातील मुलांसोबत
सुनीताताई यांचा वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमात पुष्पा बेन संघवी यांचेही
मोठे योगदान लाभले.
Post a Comment