डोंबिवलीत गॅॅ वितरकांची दादागिरी...
घरगुती गॅॅचा सुरक्षा पाईप बदला अन्यथा पुरवठा खंडित करण्याची धमकी दिल्याची तक्रार 
डोंबिवली : ( शंकर जाधव) डोंबिवली परिसरात सुमार १ लाख २० हजार घरगुती गॅॅ धारक आहेत व १२ वितरक गॅॅ  वितरणाचे काम करतात. यापैकी काही गॅॅ वितरकांचे कर्मचारी घरातील एकटी महिला बघून गॅॅचा सुरक्षा पाईप तातडीने बदलण्याची धमकी देतात व न केल्यास गॅॅ पुरवठा खंडित करण्याची धमकी देत असल्याची तक्रार आहे. एका ठिकाणी तर पाईप बदलण्यास नकार दिला म्हणून गॅॅ सिलेंडरच उचलून नेल्याची टना घडली आहे.गॅॅ वितरकांच्या दादागिरीमुळे  ग्राहक उघडपणे बोलण्यास तयार नाही.

   गॅॅ कंपनी घरगुती सिलेंडरसाठी जो सुरक्षा पाईप लाईन बसवते. त्याची पाच वर्षांची मुदत असते व दर दोन वर्षानी तो पाईप तपासणी करुन धेणे ग्रहकांच्या दृष्टीने फायद्याचे आहे एखाद्या ग्राहकांने गॅॅ पाईप बदलण्यास वा तपासण्यास नकार दिला तर वितरकाना तशी मनमानी करता येत नाही पण डोंबिवलीत अशी धटना घडत असून यामुळे नक्की नियम काय असा सवाल विचारला जात आहे शिवाय या पाईपची अधिकृत किंमत १७७ रुपये असताना कर्मचारी चारशे पाचशे रुपयांची मागणी करुन लूट करत असल्याच्याही तक्रार आहेत.मात्र दर पाच वर्षांनी जरी सुरक्षा पाईप बदलणे आवश्यक असले तरी काही ग्राहकांनी २००५ मध्ये सुरक्षा पाईप बसवला पण काही होत नाही असे समजून तो बदलण्यास नकार दिला जात आहे यासंदर्भात ठाणे रायगड जिल्हयाचे गॅॅ सघटनेचे सचिव अतुल देसाई यांना विचारले असता त्यांनीही जर एखाद्या ग्राहकांनी सुरक्षा पाईपची तपासणी केली नाही तर गॅॅस कोणत्याही कारणांने बंद करता येणार नाही असे सांगीतले.मात्र दोन वर्षानी पाईप तपासून घेणे हे गॅॅ धारकांच्या हिताचे असल्याचे त्यानी निदर्शनाला आणले. मात्र यासाठी जबरदस्ती नको असा सल्ला त्यांनी दिला.

Post a Comment

Previous Post Next Post