नवीन वर्षाच्या सुरुवातीला डोंबिवलीकरांना मिळणार मोफत योगउपचार ... 

   डोंबिवली : ( शंकर जाधव ) नवीन वर्षाचे स्वागत करताना प्रत्येकजण काहीनाकाही संकल्प करतात. नवीन वर्षाच्या सुरुवातीला डोंबिवलीकरांना मोफत योगउपचार देण्याचे योग विद्या धाम डोंबिवलीतर्फे ठरविण्यात आले.गेल्या दहा वर्षांपासून प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात ही संस्था  डोंबिवली व कल्याण शहरात अनेक ठिकाणी विनामूल्य योग प्रवेश वर्गांचे आयोजन करत असते. याचप्रमाणे यावर्षीही ३ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत डोंबिवली व कल्याण शहरात विविध ठिकाणी एकूण ९६ वर्गांचे आयोजन केले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नाना कुटे यांनी दिली. १२पहिला मजलालक्ष्मी निवास हौसिंग सोसायटीआगरकर रोडडोंबिवली (पूर्व)  येथे योगोपचार केंद्रात सदर उपचार देण्यात येणार आहे.

     योग विद्या गुरुकुल नाशिक अंतर्गत योग विद्या धाम डोंबिवली या संस्थेची स्थापना दिनांक १५ आॅॅगस्ट १९८३ रोजी झाली. तेंव्हापासून संस्थेचे प्रशिक्षित शिक्षक व कार्यकर्ते योग प्रचार व प्रसाराचे कार्य डोंबिवलीकल्याण व आजूबाजूच्या परिसरात निरपेक्षपणे करीत आहेत. संस्थेतर्फे योग प्रवेशयोग परिचययोग प्रबोधयोग प्रवीणयोग शिक्षक व योग अध्यापक असे योग विद्या गुरुकुल नाशिक अंतर्गत योग विद्यापीठाचे शासनमान्य श्रेणीबध्द अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र वर्ग घेतले जातात. आजपर्यंत पंचवीस हजार पेक्षा जास्त साधकांनी याचा लाभ घेतलेला आहे. तसेच ज्येष्ठ व वृद्ध नागरिकांसाठी योग सोपान व योग संजीवन वर्गप्राणायाम साधना आरंभ वर्गओंकार व ध्यान वर्ग घेतले जातात. तसेच कार्यालयीन योगस्ट्रेस मॅनेजमेंटस्थूलता निवारण वर्गविद्यार्थ्यांसाठी उंची संवर्धन व व्यक्तिमत्त्व विकास वर्गमहिलांसाठी प्रसूतीपूर्व योगाभ्यास वर्ग व मासिक पाळी विकार (पीसीओडीनिवारण वर्ग घेतले जातात. सदर केंद्रात प्रत्येक बुधवारी व शुक्रवारी प्रत्यक्ष उपचार केले जातात व इतर दिवशी मार्गदर्शन केले जाते. येथे हजारो रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.योग विद्या गुरुकुल नाशिक ही शिखर संस्था आदरणीय डॉ. श्रीविश्वास मंडलीक यांनी स्थापन केली असून ते कुलगुरु आहेत.योग क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल त्यांना २१ जून २०१८ रोजी भारत सरकारने प्रथम पंतप्रधान पुरस्कार पंचवीस लाख रुपयांसह देऊन सन्मानित केले आहे.अधिक माहितीसाठी व्यंकटेश  ९८६९१५२०९६  यांना संपर्क साधावा. 



Post a Comment

Previous Post Next Post