कोणाबरोबर रहायचं नी कोणाबरोबर थांबायचं हे जनतेने ठरवायचं..
-अजित पवार
डोंबिवली :- ( शंकर जाधव ) आज महाराष्ट्रातील बँकांची अवस्था द्यनिय आहे. बुलेट ट्रेनवर एवढा खर्च करण्याची या सरकारला काय गरज होती. आधी येथील समस्या सोडवा. हे सरकार जनतेचे प्रश्न सोडविण्यात कमी पडले आहे, हे आता जनतेने ओळखले आहे. देशातील अंधार हटतोय. देशाची हवा बदलतेय. आता सूर्य उगवणार. याची सुरुवात डोंबिवलीतून व्हावी. आता राज्याला पुन्हा एकदा आघाडीमुळे चांगले दिवस येतील. जनतेने आता ठरवावं कि कोणाबरोबर रहायचं नी कोणाबरोबर थांबायचं.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला साडे सहा हजार कोटी रुपयांच पॅकेज जाहीर केले होते.त्यापैकी साडे श रुपये तरी दिलेत का ? अशी जोरदार टीका गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डोंबिवलीत केली.
डोंबिवलीत एका कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. त्यावेळी राजराजे निंबाळकर, जयंत पाटील, मधुकर पिचड, शशिकांत शिंदे, गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड, महेश तपासे, आनंद परांजपे, माथाडी कामगाराचे नेते गुलाबराव जगताप, डॉ. वंडार पाटील, आदीसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अजित पवार म्हणाले, भाजप सरकार हे जुमलेबाज आहे. या सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. बेरजेचे राजकारण करायचे असेल तर ताकदीचे चेहरे निवडणुकीत उतरविणार.राष्ट्रवादी सोडून इतर पक्षात गेलेल्यांनी आपली चूक कबूल केली तर त्याचे राष्ट्रावादित स्वागत करू. पुढे अजित पवार यांनी डोंबिवली आणि कामगारांच नात अतूट असल्याचे सांगितले.वाहतूक कोंडीमुळे आणि कार्यक्रमाला उशीर होऊ नये म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डोंबिवलीत येण्यासाठी लोकलने प्रवास केला. या प्रवासाबाबत पवार यांनी स्थानकातील अस्वच्छ तेवर भाजप सरकार तोंडसुख घेतले.
Post a Comment