मनसे काढली कल्याणात भाजप सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा ....
डोंबिवली - ( शंकर जाधव)
मंगळवारी दुपारी कल्याण येथील मेट्रोच्या उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी फडके मैदान येथील स्मशानभूमी सुरक्षततेच्या दृष्टीकोनातून कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेने बंद केले होते.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर आक्षेप घेत कल्याण येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप सरकार हाय हाय घोषणा देत सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.याबाबत मनसे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम राजेश कदम यांना विचारले असता ते म्हणाले, कल्याणला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार म्हणून फडके मैदान जवळील स्मशानभूमीला पालिकेने टाळे लावणे बरोबर नाही.
#फेकुलालाजवाटतनायका
ReplyDeletePost a Comment