मानव उत्थान सेवा समिती तर्फे डोंबिवलीत सद्भावना संमेलन
डोंबिवली : ( शंकर जाधव ) शहरात प्रतीवर्षाप्रमाणे मानव उत्थान सेवा समिती तर्फे सदभावना संमेलनाचे आयोजन पुर्वेकेईल शंकर मंदिर शेजारी असणाऱ्या ज्ञानेश्वरी हिंदी माध्यमिक शाळेत करण्यात आले होते. या निमित्ताने सदभावना रली काढण्यात आली. या यात्रेत सद्गुरूदेव श्री सतपालजी महाराज, उर्मिलाबाईजी (मुंबई), सुवासिनीबाईजी (कल्याण), पारसमणीबाईजी (बेलापूर) शामाबाईजी (भिवंडी) वसईचे महात्मा आदी मान्यवर स्वामींनी नेतृत्व केले. या सदभावना रॅलीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी सद्गुरूदेव उर्मिलाबाईजी म्हणाल्या, संत परंपरेच्या विचाराच्या आधारे मानवाच्या उत्थानासाठी अशा संमेलनाचे आयोजन केले जाते. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांनी जो जीवनाच्या उन्नतीचा मार्ग सांगितला आहे त्याचे पालन करणे गरजेचे आहे. त्याचप्रमणे फक्त डोंबिवलीत नव्हे तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण अशा अनेक ठिकाणी संमेलने होत आहेत. ईश्वर हा बाहेर कोठे नाही तर तो आपल्या मनातच आहे. अशा परंपिता परमेश्वराचे स्मरण सदभावना संमेलनातून होणऱ्या सत्संगातून होत असते. सदभावना संमेलनाची प्रारंभ रविवार सकाळी झाला. संतसंग, पूजा आर्चा यानंतर यात्रेच्या रॅलीला सुरुवात संमेलन स्थळापासून झाली. शिवमंदिर, मानपाडा रोड, जोशी शाळा, हेमंत सुगंधी भांडार, दत्तनगर मार्गे पुन्हा शिवमंदिर येथे रॅलीचा समारोप झाला. सदभावना संमेलनाला डोंबिवली शाखेच्या अशोक दुबे, मनोज गुप्ता, गोरख गुप्ता, दवे, कल्याण आश्रमाचे दिलीप तिवारी, जोशी आदी प्रेमिगणानी विशेष सहकार्य केले. सदभावना संमेलनाला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, जेष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे तसेच शहरातील विविध संस्था चालक, प्रतिष्टीत मान्यवर यांनी भेट दिली. संध्याकाळी वेद, उपनिषदे,प्रवचन, सतसंग, भजन आदी अध्यात्मिक कार्यक्रमाद्वारे उपस्थित भाविकांना मान्यवरांचे मार्गदर्शन मिळाले. संमेलनाचा समारोप भंडारा महाप्रसादाने झाला.
Post a Comment