केडीएमसीचा नाट्यपप्रेमींना एप्रिल (फुल)चा वायदा !
डोंबिवली( शंकर जाधव) सांस्कृतिक शहर म्हणून टेंभा मिरवणाऱ्या डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहांचे बिघडलेले चाक अजून रुळावर येण्याची चिन्हे नाही.८ सप्टेंबर पासून वातानुकूलित यंत्रणा दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेले नाट्यगृह आणखी ४ महिने तरी सुरू होणार नाही. बंदमुळे आर्थिक परिस्थिती डबघाईला असलेल्या पालिकेला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. पण त्याचे सोयर-सुतक प्रशासनाला नसल्याचे दिसत आहे. आता हे नाट्यगृह येत्या एप्रिल १९ मध्ये सुरू करण्यात येण्याची चिन्हे असून हा वायदा `एप्रिल फुल`ठरण्याची चिन्हे आहेत.
स्थायी समितीने निविदा मंंजूर केली पण प्रत्यक्ष काम सुरू करण्याची वर्कऑर्डर काही ठेकेदाराला न दिल्याने काम सुरू होत नव्हते.नोव्हेंबर ते मार्च हा शाळा-महाविद्यालयाचा स्नेहसंमेलनाचा काळ या काळात एकही दिवस नाट्यगृह बंद नसते. रोज २५ ते ३० हजार रुपये उत्पन्न नाट्यगृह बंद असल्याने बुडाले.वास्तविक स्थायी समितीने निविदा मंजूर केल्यानंतरही ठेकेदाराला वर्क ऑर्डर का मिळाली नाही असा प्रश्न निर्माण होतो. ठेकेदाराने जेवढ्या कामाची निविदा तेवढेच काम करण्याचे ठरवले वातानुकूलित यंत्रणा दुरुस्त करताना नाट्यगृहात ओकेस्टिक खराब होणार मात्र ते काम आपण करणार नाही त्याचेही लेखी आदेश हवेत अशी ताठर भूमिका ठेकेदाराने घेतली. गुरुवारी संध्याकाळी पालिकेच्या शहर अभियंत्या सपना कोळी यांच्या उपस्थितीत नाट्यगृहातील व्हीआयपी खोलीत अधिकाऱ्याची बैठक झाली. त्यामध्ये प्रकल्प प्रमुख तरुण जुनेजा,कार्यकारी अभियंता सुभाष पाटील,विद्युत विभागाचे अधिकारी व ठेकेदार उपस्थित होते.यामध्ये नाट्यगृहांचे काम तातडीने सुरू करण्याचे व ठेकेदार कसे कसे काम करणार ते लेखी देईल असे ठरले. सावित्रीबाई फुले नाट्यगृहात ठेकेदार व अधिकारी यांची बैठक झाली. यात ठेकेदाराने कामाची प्रगती लेखी द्यावी व एप्रिल मध्ये म्हणजे आणखी ४महिन्यांनी काम पूर्ण करावे असे ठरले. तसेच कशा पद्धतीने काम करत रहाणार तेही लेखी द्यावे असे निर्देश दिले असल्याचे शहर अभियंता सपना कोळी यांनी सांगितले.
Post a Comment