कल्याणात मोबाईल चोरी विरोधी पथकाची कारवाई...
८११ मोबाईल हस्तगत, २२ आरोपींना अटक
डोंबिवली ( शंकर जाधव ) मोबाईल चोरी विरोधी पथकाने गेल्या दीड वर्षात मोबाईल स्नेचींग ,चोरी ,घरफोडी,फसवणूक ,सायबर माहिती तंत्रज्ञान कायद्याचे गुन्ह्यांचा कौशल्यपूर्ण समांतर तपास करून एकूण ५१ गुन्हे उघडकीस आणले असून या गुन्ह्यातील १७२ मोबाईल ,हरवलेले ६३९ मोबाईल असे मिळून एकूण ८११ मोबाईल ,१ दुचाकी व रिक्षा असा मिळून एकूण १ कोटी ६ लाख ५६ हजार ९३२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत २२ आरोपींना अटक केली आहेमोबाईल चोरी ,जबरी चोरी तसेच मोबाईल गहाळ होण्याच्या घटना दिवसागणिक वाढत असल्याने या घटनाना आळा घालण्यासाठी परिमंडल ३ मध्ये मोबाईल चोरी विरोधी पथक स्थापन करण्यात आले होते.
या पथकाने गेल्या दीड वर्षात मोबाईल स्नेचींग ,चोरी ,घरफोडी,फसवणूक ,सायबर माहिती तंत्रज्ञान कायद्याचे गुन्ह्यांचा कौशल्यपूर्ण समांतर तपास करून एकूण ५१ गुन्हे उघडकीस आणले असून या गुन्ह्यातील १७२ मोबाईल ,हरवलेले ६३९ मोबाईल असे मिळून एकूण ८११ मोबाईल ,१ दुचाकी व रिक्षा असा मिळून एकूण १ कोटी ६ लाख ५६ हजार ९३२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात या पथकाला यश आले असून एकूण २२ आरोपींना गजाआड केले आहे .हस्तगत करण्यात आलेले १०० मोबाईल मुळ मालकांना मुद्देमाल हस्तांतरण सोहळा कार्यक्रमा अंतर्गत सुपूर्द करण्यात येणार आहे
Post a Comment