बीएसएनएलचा पर्यावरण
संतुलनासाठी ग्राहकांना फक्त इ-बिल
कल्याण :( शंकर
जाधव ) कागदाचा वापर टाळून
पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टिकोनातून बीएसएनएलने पेपरलेस पॉलिसी
स्वीकारली असून १ जानेवारी २०१९ पासून बीएसएनएल मध्ये कागदाचा वापर टाळण्यात येणार आहे.डिजिटल
इंडिया उपक्रमाअंतर्गत बीएसएनएल च्या ग्राहकाना नववर्षापासून फक्त इ-बिल उपलब्ध होणार असल्याची
माहिती बीएसएनएल कल्याणचे महाप्रबंधक हरिओम सोळंकी यांनी दिली.लँडलाईन,मोबाईल, ब्रॉडबँड सह
बीएसएनएलच्या इतर सर्व सेवांचा लाभ घेणाऱ्या ग्राहकानां इ-बिले देण्यात येणार असून बिलाची प्रत ऑनलाइन उपलब्ध राहणार असून
तसेच ग्राहकानी दिलेल्या इमेल वर बिले पाठवन्यात येणार आहे बिलाची रक्कम व महिना
मोबाईल नंबर वर एसएमएसच्या माध्यमातून दिले जाणार आहे.यासाठी मोबाईल
क्रमांक व इमेल आयडीची नोंद करणे गरजेचे असून जिल्ह्यातील ९० टक्के ग्राहकांची नोंद केल्याची
माहिती बीएसएनएल च्या वतींने देण्यात आली
Post a Comment