केडीएमसीतील स्थायी समिती सभापती शिवसेना तर महिला व बालकल्याण समिती भाजपकडे
स्थायी समिती सभापती पदासाठी दीपेश म्हात्रे तर महिला बालकल्याण समिती सभापती पदासाठी रेखा चौधरी
डोंबिवली :- दि. ०१ ( प्रतिनिधी ) कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठीची निवड ३ जानेवारी रोजी होणार असून सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. यंदा असून दिग्गजांनी या पदावर दावा केल्याने सभापती पदाची माळ कोनाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते .अखेर आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शीवसेना नगरसेवक स्थायी समिती सदस्य दीपेश म्हात्रे यांनी सभापती पदासाठी अर्ज सादर केला तर महिला बाल कल्याण समिती सभापती पदासाठी भाजपकडून रेखा चौधरी यांचा नामनिर्देशन अर्ज सादर केला .दोघांचे ही एकमेव त्याच्या नावाची औपचारिक घोषणा ३ जानेवारी रोजी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याकडून केली जाईल.
२०१५ च्या निवडणुकी नंतर पालिकेत शिवसेने बरोबरच भाजपाचे पारडे देखील जड असल्याने भाजपाने सर्वच महत्वाच्या पदावर दावा केला होता. यामुळे स्थायी समिती सभापती पद वाटून देण्यात आले असून भाजपाला २ वर्षे तर शिवसेनेला स्थायी समिती सभापती पद ३ वर्षे देण्याचा निर्णय आपसात तडजोडीने घेण्यात आला आहे. भाजपाला पहिले आणि तिसरे वर्ष सभापती पद दिल्यामुळे आता पुढील दोनही सभापती पदावर सेनेचा दावा केला होता . यंदा निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या जागी नव्याने आठ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली . भाजपचे विद्यमान सभापती राहुल दामले यांची सभापती पदाची मुदत संपल्यानंतर शिवसेनेकडून या पदावर कोण विराजमान होणार याकडे सर्वाचे लक्ष लागलेहोते .शिवसेनेचे वामन म्हात्रे, दिपेश म्हात्रे यांच्या बरोबरच कल्याण पूर्वेतून महेश गायकवाड, निलेश शिंदे आणि कल्याण पश्चिमे कडून जयवंत भोईर यांनी या पदावर दावा केला मातब्बर नगरसेवक शर्यतीत असल्याने सेना नेतृत्वाचा कस लागला होता.३ जानेवारी रोजी होणाऱ्या सभापती पदाच्या निवडणूकिसाठी अर्ज दाखल करण्याची सोमवारी शेवटची तारीख होती .साडे पाच वाजेपर्यत नेमकी सभापती पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याबाबत सर्वांचे लक्ष लागून होते अखेर संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटांनी दिपेश म्हात्रे यांनी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या उपस्थितीत थेट सचिव कार्यालयात प्रवेश करत आपला नामनिर्देशन अर्ज सचिव संजय जाधव यांच्याकडे सोपविला.या पदासाठी म्हात्रे यांचा एकच अर्ज आल्याने त्याच्या नावाची औपचारिक घोषणा ३ जानेवारी रोजी केली जाईल. तर महिला बालकल्याण समिती सभापती पदाची निवडणूक देखील ३ जानेवारी रोजी होणार असून या पदासाठी भाजपाकडून रेखा चौधरी यांनी अर्ज दाखल केला असून या पदासाठी देखील एकच अर्ज आल्याने चौधरी यांच्या नावाची देखील औपचारिक घोषणा ३ जानेवारी रोजी केली जाईल.
Post a Comment