पालिका प्रशासनाला आणखी किती बळी हवेत ?
मानपाडा पोलीस ठाण्यासमोर झाकण नसलेले मॅनहोल...
डोंबिवली :- दि.०९ ( शंकर जाधव ) २६
ऑक्टोबर २०१८ रोजी खांबालपाडा एमआयडीसी परिसरात येथे रासायनिक सांडपाणी वाहून
नेणाऱ्या मॅनहोल मधून गुदमरून देविदास पाजगे,महादेव झोपे आणि
चंद्रभान या तीन सफाई कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.मात्र या
घटनेनंतरहि पालिका प्रशासनाला जाग आली नाही. डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा पोलीस
ठाण्यासमोरच झाकण नसलेल्या मॅनहोलकडे प्रशासनाने कानाडोळा केला आहे.त्यामुळे
पालिका प्रशासनाला आणखी किती बळी हवेत ? असा
प्रश्न डोंबिवलीकराना पडला आहे.
मानपाडा पोलीस ठाण्यासमोरील झाकण
नसलेले मॅनहोलबाबात अद्याप येथील पोलिसांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार केली नाही
याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.यापूर्वी घडलेल्या घटनेने पालिका प्रशासनाचे डोळे
उघडले नसल्याने आता याची दखल जागरूक नागरिक घेतील.वास्तविक मॅनहोलला झाकण नसल्यास
प्रशासनाने त्याठिकाणी काम सुरु असल्याचे फलक लावणे आवश्यक आहे. मात्र तसे होत
नसल्याने यापूर्वीच्या घटनाचे गांभीर्य प्रशासनाला कळले नाही.भविष्यात या ठिकाणी
एखादा नागरिक पडल्यास याची जबाबदारी प्रशासनाला घ्यावी लागेल अशी चर्चा सुरु झाली
आहे.याबाबत जागरूक नागरिक मंचच्या कार्यकर्त्या वंदना सोनावणे यांना विचारले असता
त्या म्हणाल्या, हा पालिकेचा निष्काळजीपणाचा म्हणावा
लागेल. घटना घडल्यानंतर शहाणपण येते मात्र केडीएमसीचे अजूनही डोळे उघडले नाही. आता
प्रत्येक बाबत नागरिकांनी प्रशासनाला सांगायचे का ? अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे कि नाही. असा सवाल उपस्थित केला.
Post a Comment