दिवा शहरात एकही अधिकृत रिक्षा थांबा
नाही.....
दिवा ते ठाणे आरटीओ कार्यालयात
रिक्षाचालकांचा मोर्चा काढण्याचा इशारा...
डोंबिवली
:- दि.१० ( शंकर जाधव) झपाट्याने शहरीकरण झालेल्या दिवा शहरात एकही
अधिकृत रिक्षा थांबा नाही नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.दिवा शहराची सुमारे पाच
लाख लोकसंख्या असून ८०० रिक्षाचालक आहेत.मात्र या शहराला प्रादेशिक परिवहन विभाग
आणि वाहतूक विभागाने पाठ दाखविल्याने दिवावासियांनी नाराजी व्यक्त केली आहे.दिवा
शहरात दोनच रिक्षा संघटना असून दिवा मानपाडा ग्रामीण रिक्षा चालक मालक संघटनेचे
अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी विभागांना पत्रव्यवहार करून अधिकृत रिक्षा थांबा
बनविण्यात यावा अशी मागणी केली होती. लवकरात लवकर या मागणीचा गांभीर्याने विचार
करावा अन्यथा दिवा ते ठाणे आरटीओ कार्यालयात रिक्षाचालकांचा मोर्चा काढण्याचा
इशारा दिला आहे.
मुंबई
आणि उपनगरातील नागरिकांनी जवळचे ठिकाण शहर म्हणून दिवा, डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ
या शहराला पसंती दर्शविली.त्यामुळे या शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे नागरिकांना
सुविसुविधा उपलब्ध होऊ लागल्या.यात प्रामुख्याने दिवा शहर हे फार झपाट्याने वाढत
गेले.त्यासाठी दळवळणाचे साधन म्हणून रिक्षांची मागणी वाढली.मात्र प्रादेशिक परिवहन
विभाग आणि वाहतूक बिभागाने दिवा शहरातील वाहतूक व्यवस्थेकडे कानाडोळा केल आहे.
त्याचा परिमाण म्हणून अनधिकृत रिक्षा थांबे तयार झाले.यात येथील रिक्षाचालकांची
चूक नसून अधिकृत रिक्षा थांबे करण्यात यावे अशी मागणी दिवा मानपाडा ग्रामीण रिक्षा
चालक मालक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी परिवहन विभाग आणि वाहतूक बिभाग
आणि ठाणे महानगरपालिकेकडे केली होती. लवकरात या मागणीवर विचार करून अधिकृत रिक्षा
थांबे आणि वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात यावी अन्यथा दिवा ते ठाणे आरटीओ
कार्यालयात रिक्षाचालक भव्य मोर्चा काढतील आ इशारा दिला आहे. याबाबत
ठाणे आरटी अधिकारी श्याम लोही यांना संपर्क केला असता ते म्हणाले, ठाणे
महानगरपालिका, प्रादेशिक
परिवहन विभाग आणि वाहतूक विभाग या कमिटीकडे मागणी केल्यास शहराचा सर्वे केला जाईल.
त्यानुसास रिक्षा थांबे ठरविले जाईल.दिवा मानपाडा ग्रामीण रिक्षा चालक मालक
संघटनेचे अध्यक्ष रोहिदास मुंडे
यांना विचारले असता ते म्हणाले, तीन
महिन्यापूर्वी ठाणे महानगरपालिका,प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक विभाग
यांच्याकडे रिक्षा थांब्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. मात्र अद्याप याबाबत
सर्वे झाला नाही.
कोण
आहेत हे वसुली `स्टॅडभाई` ?
अनधिकृत रिक्षा
थांबे तयार झाले आणि त्यामागोमाग वसुली स्टॅडभाई पण तयार झाले.या रिक्षा
थांब्यात रांगेने रिक्षा उभा केल्या जात असल्या तरी उशिरा येईल त्याचा पहिला नंबर
लावण्यासाठी `स्टॅडभाई`ना काही
रक्कम द्यावी लागते.यांची एवढी दहशत आहे कि, त्याच्या
विरोधात कोणताही रिक्षावाला आवाज करू शकत नाही. स्थानिक पोलीस आणि वाहतूक
पोलीसांना हे वसुली `स्टॅडभाई` कोण आहेत याची माहिती असल्याचे बोलले जात असून त्याच्यावर अद्याप का
कारवाई झाली नाही असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
Post a Comment