मनसे नगरसेवक प्रकाश भोईर आणि नगरसेविका सरोज भोईर यांच्यावतीने नागरिकांना विनामूल्य पंढरपूर यात्रा...
डोंबिवली :- ( शंकर जाधव ) मनसेचे जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश भोईर आणि नगरसेविका सरोज भोईर यांच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर येथे ६० वर्षावरील जेष्ठ नागरिक व सेवेकरी यांच्यासाठी विनामूल्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.आगामी निवडणुकीत मनसेला घवघवीत यश मिळावे आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी काम ककरण्याची संधी मिळावी अशी प्रार्थना श्री विठ्ठ्ल्याच्या चरणी करणार असल्याचे नगरसेवक प्रकाश भोईर यांनी सांगितले.
भोईर दाम्पत्याने मनसेचा व भगवा झेंडा फडकावून यात्रेचा शुभारंभ केला.यावेळी महिला शहर स़घटक मंदा पाटील, मनसेचे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र संघटक मनोज घरत, शहर सचिव सुभाष कदम, विभाग अध्यक्ष श्रीकांत वारंगे, उपविभाग अध्यक्ष सुरेश मुणगेकर, सचिन सणस, शाखा अध्यक्ष दिपक धोंडे, संदीप ( रमा ) म्हात्रे, कदम भोईर,महिला उपशहर अध्यक्षा निलिमा भोईर, महिला विभाग अध्यक्षा सुषमा वालीपकर, महिला शाख अध्यक्षा भावना देसाई, राजश्री आचार्य उपस्थित होते.यावेळी मनोज घरत म्हणाले की, जेष्ठ नागरिकांना श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनाची पर्वणी नगरसेवक प्रकाश भोईर व सरोज भोईर यांच्या मुळे उपलब्ध झाली आहे. स्वर्गीय शशिकांत ठोसर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून ठोसर यांची आठवण सांगतो.एका कार्यक्रमास उपस्थित असताना ठोसर यांनी भोईर दाम्पत्याना विठ्ठल रखुमाईची उपमा दिली होती.गेली वीस पंचवीस वर्ष ही विठ्ठल रखुमाईची ज़ोडी आपल्यासाठी काम करीत उभी आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना निवडून देत आहात असाच विश्वास कायम ठेवा.सगळ्यांना विठ्ठल दर्शनाची संधी मिळाली आहे. त्याचा लाभ घ्या अश्या शुभेच्छा मंदा पाटील यांनी दिल्या.प्रकाश भोईर यांनी यात्रेबद्ल मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आपल्या आईवडिलांना पंढरपूर यात्रेला घेऊन जात आहोत, या भावनेने सेवेकरांनी सेवा करावी.तर आपला मचलगा असल्याची भावना मनात ठजवून हक्काने सेवेकरांकडून जेष्ठ नागरिकांनी सेवा करावी असे प्रकाश भोईर यांनी सांगितले. पंढरपूर यात्रेसाठी निघालेल्यांपैकी पाच ज्येष्ठ नागरिक यात्रेकरुंचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
Post a Comment