पंतप्रधान होण्यासाठी शरद पवारांना समाजवादी फाँवर्ड ब्लाँकचा बिनशर्त पाठिंबा....
डोंबिवली ( शंकर जाधव ) आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने एकीकडे भाजप आणि शिवसेना या दोन पक्षात `तुझ माझ जमेना नी तुझ्या वाचून करमेना`अशी अवस्था झाली आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी इतर समविचारी पक्षांनाएकत्र घेऊन महाआघाडी करण्यासाठी रणनीती आखत आहे.या महाआघाडीत आता समाजवादी फाॅवर्ड ब्लॉकने बिनशर्त पाठिंबा दर्शविला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी समाजवादी फाॅवर्ड ब्लॉकचे महासचिव सतीशराज शिर्के यांची नुकतीच डोंबिवलीत एका कार्यक्रमात भेट झाली. त्यावेळी पाटील यांनी शिर्के यांना राष्ट्रवादीला पाठिंबा द्यावी अशी ऑफर केली होती.
डोंबिवलीत एका कार्यक्रमात राष्ट्रावाडीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आले असता राजराजे नाईक-निंबाळकर आणि समाजवादी फाॅवर्ड ब्लॉकचे महासचिव सतीशराज शिर्के यांनी भेट घेतली. राष्ट्रवादीला पाठिंबा दुयावी अशी इच्छा ज्यावेळी पाटील यांनी शिर्के यांच्याकडे व्यक्त केली होती. यावर चर्चा होऊन महासचिव सतीशराज शिर्के यांनी मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होण्याची वाट पाहत असताना यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे या पदासाठी योग्य असल्याचे सांगत राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा देऊ असे सांगितले. लोकसभा निवडणुकीनंतर जास्तीत जास्त खासदारांचे संख्याबळ असावे या उद्देशाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रयत्न सुरु केले आहे.आगामी निवडणुकांमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत इतर समविचारी पक्षांना सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.दिल्लीतील राजकीय परीस्थितिचा कानोसा घेतला असता कॉंग्रेसचे राहुल गांधी यांच्यासोबत बसपाच्या मायावती ,तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बनर्जी यांचे नाव पंतप्रधानाचे दावेदार म्हणून चर्चेत आहे. परंतु कॉंग्रेस सोबतच्या महाआघाडीत माया-ममता यांच्या नावाला विरोध होऊ शकतो.कॉंग्रेस मधून राहुल गांधी यांच्या नावावर पंतप्रधान म्हणून शिक्कामोर्तब झाला नसल्याने महाआघाडीतील पक्ष शरद पवार यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे करू शकतात.आपल्या पक्षातर्फे राष्ट्रवादी सोबत युती करू शकते. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून जागा लढविण्यात आहोत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लोकसभेसाठी पाच जागांची मागणी करण्यात येईल.महाराष्ट्रातील नागपूर,विदर्भ,वर्धा,पुणे,पिं परी- चिंचवड, रायगड,ठाणे,मुंबई, रायगड येथे समाजवादी फोव्र्द ब्लॉकच्या वतीने उमेदवार उभे करणार आहोत.त्याचप्रमाणे देशात मध्यप्रदेश,बिहार,पूर्णिया,झा रखंड,धनबाग,पश्चिम बंगाल., पुरुलिया,राजस्थान, भरतपूर, पिंकननगरी,जैसलमेर, गोवा या जागांवर पक्षाच्या वतीने निवडणुकीत लढविली जाणार आहे असल्याचेहि शिर्के यांनी सांगितले. राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, हरियाना, उत्तरप्रदेश, दिल्ली, झारखंड आणि महाराष्ट्र या राज्यातील लोकसभा निवडणुकीची जबाबदारी सतीशराज शिर्के यांच्यावर सोपविण्यात आली आहे.त्यामुळे प्रत्येक राज्यातील दोन लोकसभा मतदार संघात निवडणुका लढविणे अनिवार्य असल्याचे पक्षाने म्हंटले आहे..जातीयवादी शक्तींना विरोध करण्यासाठी समाजवादी पक्षाच्या धोरणानुसार शरद पवार यांना समर्थन देण्यात येत असल्याचे समाजवादी फाॅवर्ड ब्लॉकच्या वतीने सांगण्यात आले.
Post a Comment