भाजप सरकारचा जाहीर निषेध करत राष्ट्रवादीचा डोंबिवलीत रस्ता रोको...
डोंबिवली : ( शंकर जाधव ) देशातील केंद्र सरकारला ५६ महिने तर राज्यातील सरकारला ५० महिने पूर्ण झाले आहे.परंतु या सरकारने जनतेला दिलेले आश्वासनांची पूर्तता हे सरकार करू शकलेले नाही.कल्याण-डोंबिवलीत नव्याने स्नाविष्ट झालेल्या २७ गावातील बंद असलेली दस्त नोंदणी,२७ गावांच्या विकासासाठी साडे शा हजार कोटींचे गाजर याचा जाब विचारत या सरकारचा जाहीर निषेध करत मंगळवारी डोंबिवली पूर्वेकडील टाटा पाॅवर येथे राष्ट्रवादि कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले.
आमदार जगन्नाथ शिंदे, राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे, जिल्हा अध्यक्ष रमेश हनुमंते,ग्रामीण नेते डॉ. वंडार पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष सुधीर पाटील,डोंबिवली शहर अध्यक्ष राजू शिंदे, डोंबिवली कार्याध्यक्ष भाऊ पाटील,माजी जिल्हाअध्यक्ष अर्जुनबुवा चौधरी, महिला जिल्हाअध्यक्षा सारिका गायकवाड,डोंबिवली विधानसभा महिला कार्याध्यक्षा पूजा पाटील, शोभा कोटियन, उज्वला भोसले,,कल्याण पश्चिम महिला अध्यक्षा अनिता वारुकक्षे, कल्याण पूर्व अध्यक्ष जानु वाघमारे, जिल्हा सरचिटणीस क्षितीज जाधव, सरकार सेलचे जिल्हा अध्यक्ष राम माने, हिंदी भाषिक सेलचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद सोनी याच्यासह गुलाब वझे, दत्ता वझे, बाबाजी पाटील,सोशल मिडिया जिल्हाअध्यक्ष निरंजन भोसले,समीर गुधाटे आदीसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी येथील रस्ता रोको केले. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.यावेळी जगन्नाथ शिंदे म्हणाले,२७ गावांचा विषय विधानसभेत तीन वेळा चर्चेला आला होता. मात्र विधानसभेत हा प्रश्न सुटत नाही, याचा अर्थ ह्या सरकारचे २७ गावांबाबत वेळकाढू धोरण सुरु आहे. हे सरकार कल्याण –डोंबिवलीकरांवर अन्याय करत आहे. आमच्या मागणी मान्य केले नाही तर राष्ट्रवादी हे आंदोलन अधिक तीव्र करू करू. तर डॉ. वंडार पाटील म्हणाले, सरकारने गोर गरीब जनतेचे वाटोळे केले आहे.याचा निषेध करत आहोत. २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका बनवू असे ह्या सरकारने आश्वासन दिले होते.आज राज्यात काय परीस्थिती झाली आहे. १५ लाख रुपये खात्यात टाकू असे जनतेला आश्वासन दिले होते. त्यामुळे या भाजप सरकारला जनता कंटाळली आहे. आता आघाडी सरकारचे सरकार येणार आहे. त्यानंतर नायब तहसीलदार प्रवीण पाटील यांना आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. २७ गावांचा विकास करण्याऐवजी हे सरकार त्यांना न्याय देत नाही. त्यामुळे आज राष्ट्रवादीला जनतेसाठी रस्त्यावर उतरावे लागले. यापुढे या आंदोलनाची याची दाखल घेतली नाही तर यापुढे सत्ताधारी स्थानिक लोकप्रतिनिधी यांना गाव बंदी करू असा इशारा यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष सुधीर पाटील दिला.
Post a Comment