भाजपा ठाणे विभाग आणि वे ट्र्यु लाईफ सामाजिक संस्थाच्या वतीने आश्रमातील मुलांसोबात साजरा  करण्यात आला नविन वर्ष व पत्रकार दिन





कल्याण : नविन वर्ष व पत्रकार दिन निमित्ताने या दिवसाचे अवचीत्य साधुन भाजपा ठाणे विभाग आणि वे ट्र्यु लाईफ सामाजिक संस्थाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते भाजपा विभागीय सचिव डॉ राजु राम व ॲड सौ शिल्पा राम यांनी गरिब आनाथ दत्तक घेतलेल्या वे ट्र्यु लाईफ सामाजिक संस्थेच्या आश्रमात मुलांसोबत साजरा केला. यावेळी राम दांपत्यनी मुलांना नविन कपडे, खेळणी, खेळण्याचे साहित्ये दिले आणि त्यांना जेवण देवुन सोबत जेवण केले. दिवसभर त्यांना सोबत राहुन अनेक खेळ खेळले, दिवसभर आनंदाने  साजरा केला. यावेळी पत्रकारिता, सामाजिक, राजकिय घडामोडीबद्दल माहिती दिली आणि सर्वांची प्रगती अपडेट्स घेतले व दिले. त्यांना शिक्षणाचे महत्व पटवुन शिक्षणास मार्गदर्शन केले. अशा प्रकारे नविन वर्ष व पत्रकार दिन साजरा केला.

Post a Comment

Previous Post Next Post