के बी के इंटरनॅशनल स्कूल व लाइफ केअर हॉस्पिटल उल्हासनगर १ यांच्या संयुक्त विद्यमानाने व पत्रकार दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न ...
टिटवाळा : रविवारी दिनांक ६/१/२०१९ रोजी के बी के इंटरनॅशनल स्कूल बल्यानी येथे आयोजन कऱण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचे नगरसेविका नमिता पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले. त्यानंतर शिबिरास सेवा देण्यासाठी आलेले डॉ. मो . शहाबुद्दीन व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे ,उपस्थित मान्यवर व सर्व पत्रकार यांचे पत्रकार राजू टपाल ,सुबराव खराडे व केबीेके स्कूल च्या प्रिन्सिपल ज्योती खराडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
शीला राठोड यांनी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले व शिबीरात होणाऱ्या तपासण्या व आलेले तज्ञ डॉक्टर यांची सविस्तर माहिती देण्यात आली.तद्नंतर केबीके स्कूलचे अध्यक्ष सुबराव खराडे यांनी आलेले सर्व मान्यवर ,पत्रकार व शिबिरास बहुमूल्य सेवा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले . या शिबिरास तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते नेत्र तपासणी ,हृदय तपासणी ,ई .सी.जी, बी. पी., शुगर, हिमोग्लोबिन, हाडांची संपुर्ण तपासणी, स्त्री रोग तपासणी या तपासणी करण्यात येऊन ४१९ गरजूंनी शिबिराचा लाभ घेतला.या शिबिरास नगरसेविका शारदा गायकवाड , नगरसेवक मयूर पाटील ,आर.पी.आय.तालुका संघटक नाना पवार ,समाजसेवक संतोष शिंगोळे ,संदीप गायकवाड ,हेमंत गायकवाड ,राजू पाटील ,सुभाष राजपूत ,उद्योजक रवी पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Very nice.
ReplyDeletePost a Comment