डोंबिवलीतील माँडेल इंग्लिश स्कूलचा ९९%निकाल
डोंबिवली - दि.०८( शंकर जाधव )
माध्यमिक शालांत परीक्षेत केरलीय समाज संस्थेच्या माँडेल इंग्लिश स्कूलचा ९९% निकाल लागला आहे.माँडेल स्कूलच्या वतीने २०१९ मध्ये शालांत परिक्षेत एकूण ४०६विद्यार्थी या परिक्षेसाठी बसले होते.त्यातील ४०५विद्यार्थी पास झाले.मात्र एक विद्यार्थी परिक्षेत बसु न शकल्याने शाळेचा निकाल ९९.७५लागला आहे. गेल्या वर्षी १००% निकाल या शाळेचा लागला होता.सानिया पुरुषोत्तम ९५%, सानिया जाँन साळवे ९४.२०, सर्वेश
देशपांडे ९४.२० असे गुण विद्यार्थ्यांना प्राप्त झाले आहेत.१९८ विद्यार्थाना उच्च श्रेणी आणि१६१ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली.तर ४६ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी मिळाली आहे.अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका वलसा जोश यांनी दिली.
Post a Comment