टिटवाळयात दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात
सहा जण गंभीर जखमी तर एकाचा मृत्यू
टिटवाळा :-
टिटवाळा पूर्वेकडील स्टेशनकडून कल्याणच्या
दिशेने बनेलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मधुबन बिल्डिंग
समोर दोन दुचाकीच्या समोरासमोर
झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर सहाजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी
घडली आहे.
शनिवारी मध्यरात्री नंतर १२.१५ वाजण्याच्या सुमारास
बनेली रस्त्याच्या
महात्मा फुले चौकात मधुबन बिल्डिंग समोर बनेली येथील कामलाकर जाधव नगर तिवारी चाळ
रूम नं२मध्ये राहणारे हिरामण चौधरी पत्नी वनिता, मुले तन्मय, संकेत यांच्या सह होंडाशाईन दुचाकी क्रमांक एम्.एच्५०एस् एच् ८२६६ या दुचाकीवरून
घरी जात असताना समोरून भरघाव वेगाने आलेल्या ज्युपिटर एम् एच्०५टी.सी.२३४या दुचाकी
ने धडक दिल्याने अपघात झाला. त्यात होंंडाशाईन वरील हिरामण चौधरी,
पत्नी वनिता, मुले तन्मय, संकेत, हे चार जण गंभीर जखमी झाले. तर ज्युपिटर वरील मुन्ना महंमद, धरमेश कनोजिया, अन्य एकजण गंभीर जखमी झाले. स्थानिक लोकांच्या
मदतीने येथील महागणपती रूग्णालयात दाखल करण्यात आले. यातील सकाळी गंभीर जखमी
असलेल्या मुन्ना महंमद यांचा कल्याण येथे रूग्णालयात नेण्यात असताना त्यांचा सकाळी मृत्यू झाला. याबाबतचा अधिक तपास पोलीस
उपनिरीक्षक राजेश खोपकर हे करत आहेत .
*अनेकदा इच्छित स्थळी पोहचण्यासाठी गाडीची वेगमर्यादा वाढवली जाते . मात्र
वेळेत पोहचण्यासाठी वापरण्यात येणारे हेच वाहन आपल्या अतिघाईमुळे
आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या जीवावर बेतत आहे.*
·
*कृपया वाहने काळजीपूर्वक चालवा मुंबई
डेटलाईन २४ जनहितार्थ*
Post a Comment