डोंबिवलीमध्ये भररस्त्यात वृक्ष उन्मळल्याने  दोन रिक्षांचे नुकसान

    एक महिला किरकोळ जखमी


डोंबिवली : - ( शंकर जाधव )  डोंबिवली पूर्व भागात आयरे रोडवरील स्वामी शाळेजवळील असणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यावर रविवारी सकाळी १०  वाजण्याच्या सुमारास मोठे झाड कोसळले. तेथील नजकीच असणाऱ्या हेरंब बिल्डिंगसमोर ही घटना घडली. या घटनेमध्ये झाड पडून दोन ऑटोरिक्षाचे नुकसान झाले असून, एक महिला किरकोळ जखमी झाली. या जखमी झालेल्या महिलेवर जवळच असणाऱ्या दवाखान्यात उपचार करून सोडण्यात आले आहे. मात्र तिचे नाव कळू शकले नाही. सदर घटनेची माहिती मिळताच ईगल ब्रिगेड फांऊडेशनचे सदस्य अनुप इनामदार  त्यांचे सहकारी अभिजित अडकर,विवेक सावंत,व्येंकटेश्वर मिश्रा, प्रसाद मोरे 

यांनी अग्निशमन दलाचा याची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी काम सुरू केले. दुपारी साडेबाराच्या सुमारास हे झाड कापून परिसर मोकळा करण्यात आल्याची माहिती  ईगल ब्रिगेड फांऊडेशनचे संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांनी सांगितले.  कोसळलेले हे झाड कमकुवत अवस्थेत होते. आयरे रोडवरून एक जेसीबी गेल्यानंतर त्याचा धक्का झाडाच्या फांदीला बसल्याने हे झाड मुळासकट कोसळल्याची घटना घडली, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले

Post a Comment

Previous Post Next Post