डोंबिवली रेल्वे स्थानकातील घटना
ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे स्थानकात महिलेने गोंडस बाळाला जन्म....
डोंबिवली: ( शंकर जाधव- डोंबिवली ) - बुधवारी सकाळपासून कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुडूंब गर्दी झाली होती याच दरम्यान खडवली येथे राहणारी जस्मिन शेख हि गरोदर महिला वैद्यकिय तपासणीसाठी मुंबई येथील कामा रुग्णालयात लोकल ने जात होती डोंबिवली स्टेशननजीक लोकल पोह्चताच तिला प्रसूती वेदना सुरु झाल्या त्यावेळी रेल्वे स्थानकातील काही महिला आणि पुरुष प्रवाश्यांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने या फलाटावर उतरवले सकाळच्या सव्वा सात सुमरास या जस्मिनने गोंडस मुलाला जन्म दिला .रेल्वे पोलिसांनी तत्काळ जस्मिन व तिच्या बाळाला डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. या माय- लेकांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Post a Comment